manoj jarange patil : लोणावळ्यातून मुंबईला निघणार की नाही? मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका
- Published by:sachin Salve
Last Updated:
त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ येणार आहे. त्यात परिपत्रक आणि शासन निर्णय येणार आहे. तोपर्यंत आम्ही मुंबईत निघणार आहोत.
लोणावळा : 'आम्हाला आंदोलन करायचं आहे, हे खरं आहे, समाजाला न्याय द्यायचा आहे. सरकारने मार्ग काढावा अशी आमचीही अपेक्षा आहे. सरकारने कुठे तरी तोडगा काढावा, इथं काढाला तर इथं आम्ही मागे जाऊ. मुंबई गेलो तरी तोडगा निघणार आहे. पण अजूनही तोडगा निघाला नाही. त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ येणार आहे. त्यात परिपत्रक आणि शासन निर्णय येणार आहे. तोपर्यंत आम्ही मुंबईत निघणार आहोत. काही जणांच्या बातम्या आल्या आहेत, लोणावळ्यात गुलाल उधळणार आहोत. पण काहीच निर्णय होत नाही. 54 लाख नोंदी काढल्या आहेत, येत्यात असं सांगत आहे. पण मी कुठे थांबू शकत नाही. त्यामुळे आम्ही निघणार आहोत. आता शिष्टमंडळ जिथे येईल तिथं थांबून चर्चा करणार आहोत, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केलं आहे.
पोलीस प्रशासनाकडून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून मनाई करण्यात आली आहे. तशी नोटीस बजावली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईला निघणारच, असं ठामपणे सांगितलं.
'आता एक मोठं शिष्टमंडळ येणार आहे, असं म्हटलं आहे. मंत्री आणि सचिव येतील. तुम्ही सांगा आले तर हॉटेल आणि घरात बसून चर्चा करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हीसीवर चर्चा करणार होतो. पण इथं रेंज नाही. त्यामुळे चर्चा करणार नाही असं सांगितलं आहे. साहेबांशी किती बोलावं. आता माझी जाहीर विनंती आहे, आम्ही काही मजा करायला आलो नाही. इथं माझ्या मराठा बांधव थंडी वाऱ्यात बसले आहे. आमचंही सोप्पं नाही. आमचेही हाल होत आहे. मुख्यमंत्री साहेब, फडणवीस आणि अजितदादांनी एकत्र येऊन चर्चा करावी. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. त्यांनी यावं आणि लगेच तोडगा काढावा' अशी विनंतीही मनोज जरांगेंनी केली.
advertisement
'हे असंच चालू राहणार आहे, शिष्टमंडळ येणार चर्चा सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तिघांनी एकत्र यावं आणि चर्चा करावी, अशी आमची विनंती आहे' असंही जरांगे म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 25, 2024 2:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
manoj jarange patil : लोणावळ्यातून मुंबईला निघणार की नाही? मनोज जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका