Lucky Mala: या झाडापासून बनवलेली माळ शुभ फळदायी! धारण केल्यानं मिळते सुख-समृद्धी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Mala : तुळशीची माळ धारण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, तुळशीच्या माळेत देवी लक्ष्मी स्वतः वास करते आणि तुळशीच्या माळेने जप केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. यामुळे मनाला शांती तर मिळतेच, पण आत्माही शुद्ध होतो.
मुंबई : हिंदू धर्मात माळा घालणे खूप शुभ मानले जाते. माळ धारण केल्यानं किंवा माळेनं जप केल्यानं देवता सर्व मनोकामना ऐकतात असे म्हणतात. त्याचबरोबर जपमाळेनं नामजप केल्यानं एकाग्र होण्यास मदत होते आणि मनही शांत होते. माळांचे अनेक प्रकार आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे तुळशीची माळ. तुळशीची माळ धारण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, तुळशीच्या माळेत देवी लक्ष्मी स्वतः वास करते आणि तुळशीच्या माळेने जप केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. यामुळे मनाला शांती तर मिळतेच, पण आत्माही शुद्ध होतो. जाणून घेऊ तुळशीच्या माळेने जप करण्याचे आणि ही जपमाळ धारण करण्याचे फायदे आणि नियम.
तुळशीची माळ धारण करण्याचे फायदे -
तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. तुळशीच्या जपमाळेनं जप केल्यानं किंवा तुळशीची जपमाळ धारण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा होऊन घरात सुख-समृद्धी येते.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीला भगवान विष्णूची प्रिय मानले जाते. तुळशीच्या माळेने भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा.
तुळशीची माळ धारण केल्यानं व्यक्तीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. विष्णू कृपेनं व्यक्तीच्या कुटुंबात आनंद येतो.
advertisement
मान्यतेनुसार, तुळशीची माळ धारण केल्याने बुध आणि शुक्र ग्रह मजबूत होतात. यामुळे मनही शांत राहते.
तुळशीची माळ घालण्याचे नियम -
तुळशीची जपमाळ धारण करण्यापूर्वी ही जपमाळ गंगाजलाने शुद्ध केली जाते. यानंतर तुळशीमातेच्या मंत्रांचा जप केला जातो आणि त्यानंतर माळ घातली जाते.
तुळशीची माळ धारण करणाऱ्या व्यक्तीला सात्विक भोजन करावे लागते. तुळशी माळ धारण करणारी व्यक्ती मद्यपान करू शकत नाही किंवा तामसिक आहार घेऊ शकत नाही.
advertisement
तुळशीची माळ धारण करणाऱ्यांना रुद्राक्ष धारण करण्यास मनाई आहे. दोन्ही प्रकारच्या माळा एकत्र घालणे योग्य मानले जात नाही.
तुळशीच्या माळेची रोज पूजा केली जाते आणि एकदा ही माळ धारण केल्यानंतर काढू नये, असे सांगितले जाते. सकाळी नैसर्गिक विधीपूर्वी माळा काढली जाते आणि आंघोळीनंतर पुन्हा घालतात.
advertisement
असे मानले जाते की, ज्यांना गळ्यात तुळशीची माळ घालण्यास अडचण आहे त्यांनी उजव्या हातावर बांधांवी.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 20, 2024 6:59 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Lucky Mala: या झाडापासून बनवलेली माळ शुभ फळदायी! धारण केल्यानं मिळते सुख-समृद्धी


