Bhaubeej 2024: ओवाळिते मी भाऊराया..! भाऊबीज नेमकी कधी? विजय मुहूर्तावर करा औक्षण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Bhaubeej 2024: भाऊबीज हा सण बहीण आणि भावाप्रती श्रद्धा आणि प्रेमाचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि..
मुंबई : हिंदू धर्मात भाऊबीज या सणाला विशेष महत्त्व आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेला हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. भाऊबीज हा सण बहीण आणि भावाप्रती श्रद्धा आणि प्रेमाचा सण आहे. या शुभ मुहूर्तावर बहिणी आपल्या भावाला ओवाळतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि संकटांमध्ये आपण सोबत असल्याचे वचन देतो. या दिवशी यम द्वितीयाही साजरी होते. यावर्षी 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेचा सण साजरा केला जाणार आहे. ओवाळण्यसाठी शुभ मुहूर्त-विधी-तिथी जाणून घेऊ.
भाऊबीज कोणत्या तिथीला -
वैदिक कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याची द्वितीया तिथी 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 वाजता सुरू होईल आणि कार्तिक द्वितीया तिथी 3 नोव्हेंबर रोजी रात्री 10:5 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होईल.
भाऊबीज 2024 शुभ मुहूर्त -
पंचांगानुसार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.38 पर्यंत सौभाग्य योग राहील. यानंतर शोभन योग तयार होईल. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी पूजेची सर्वोत्तम वेळ सकाळी 11.46 असेल.
advertisement
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 04:51 AM ते 05:43 AM
विजय मुहूर्त - दुपारी 01:54 ते 02:38 पर्यंत
गोधूली मुहूर्त - संध्याकाळी 05:34 ते संध्याकाळी 06.00
भाऊबीजेचे महत्त्व -
भाऊबीजेच्या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा करण्याची परंपरा आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला अधिक दृढ करणारा सण आहे. अनेक ठिकाणी बहिणी या दिवशी व्रत उपवास करतात. अनेक ठिकाणी या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो आणि बहिण त्याला ओवाळते औक्षण करते. यामुळे भावाचा अकाली मृत्यू टळतो, तर या दिवशी बहिणींच्या घरी जाऊन भोजन केल्याने भावाचे आयुष्य वाढते आणि सुख-समृद्धी येते, असेही मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2024 8:57 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Bhaubeej 2024: ओवाळिते मी भाऊराया..! भाऊबीज नेमकी कधी? विजय मुहूर्तावर करा औक्षण