Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्र पाहू नका, देवघच्या पंडितांनी सांगितलं कारण

Last Updated:

Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन त्याज्य का असतं?

News18
News18
परमजीत
देवघर (झारखंड) : गणपती हे पहिले पूजनीय दैवत मानले जाते. अधिनायक असं त्याचं नाव आहे.  गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणताही यज्ञ, पूजा अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की गणपतीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट, अडथळे दूर होतात. त्यामुळे गणपतीला संकटमोचक असेही म्हटले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी देशभरात गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.
advertisement
या दिवशी विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाईल, त्याचा आवडता प्रसादही अर्पण केला जाईल, असे केल्याने घरात सुख-समृद्धी वाढते. पण गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला काही गोष्टी निषिद्ध असतात. याविषयी देवघरचे प्रसिद्ध ज्योतिष पंडित नंदकिशोर मुदगल यांनी Local18 ला माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, यावर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला म्हणजे शनिवारी गणेश पूजा करून प्रतिष्ठापना करावी. यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी हा दिवस आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला चतुर्थी तिथीपासून सुरुवात होते आणि चतुर्दशी तिथीला उत्सवाची सांगता होते.
advertisement
चंद्र बघायला जाऊ नका
पंडित मुदगल म्हणाले, "चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्यास जाऊ नका, अशी सूचना ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुदगल यांंनी केली. या दिवशी चंद्रदर्शन झालं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दिवशी चंद्र पाहून कोणीतरी तुमच्यावर खोटा कलंक किंवा आरोप लावू शकतो."
चंद्रदर्शन का आहे निषिद्ध?
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र दिसू नये, असे ज्योतिषी सांगतात. गणपतीच्या लंंबोदर रूपाची सर्वजण पूजा करत असताना चंद्राने खिल्ली उडवली अशी कथा आहे. गणपतीने चंद्राला शाप दिला. त्या दिवशी गणेश चतुर्थी तिथी होती. जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला संकटाला सामोरं जावं लागेल, असा तो शाप होता.
advertisement
भगवान श्रीकृष्णालाही या शापाच्या परिणामाला सामोरे जावे लागले होते. यामागची आख्यायिका अशी आहे की, एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी चंद्राचे दर्शन घेतले होते. त्यांच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप झाला. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नका.
पूजेसाठी शुभ मुहूर्त
7 सप्टेंबर रोजी गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या दिवशी रवियोग आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी सुरू होत असून तो १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत चालणार आहे, त्यामुळे या वेळी मूर्तीची स्थापना केल्यास शुभ फलदायी ठरणार आहे.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही चंद्र पाहू नका, देवघच्या पंडितांनी सांगितलं कारण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement