नवीन वर्षानिमित्त काढण्यात आली प्रभू श्रीरामांची 25 फुटांची रांगोळी; वर्ध्यातील साईबाबा मंदिरातील पाहा आकर्षक Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या रांगोळीमध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमा आणि अयोध्येच भव्य असं श्रीरामाचे मंदिर रेखाटण्यात आलं आहे.
अमिता शिंदे
वर्धा : सगळीकडे नवीन वर्षाचं जल्लोशात स्वागत सुरू आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वर्धा शहरातील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरात रमण आर्ट्सच्या रांगोळी कलाकारांनी 25 फुटांची रांगोळी रांगोळी साकारली असून या रांगोळीमध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिमा आणि अयोध्येच भव्य असं श्रीरामाचे मंदिर रेखाटण्यात आलं आहे. आकर्षक रांगोळी आणि रांगोळीतून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याकरिता वर्धेकरांचीही गर्दी दिसून येते आहेत.
advertisement
दरवर्षी काढली जाते भव्य रांगोळी
नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला दरवर्षी साई मंदिरामध्ये आम्ही मोठ्यात मोठी रांगोळी काढण्याचा आमचा उपक्रम असतो. यावर्षी आम्ही अयोध्या राम मंदिर या विषयावर या ज्वलंत विषयावर रांगोळी काढण्याचा मानस केला आणि त्यानुसार आम्ही आज इथे 25 फूट लांब अशी श्रीरामाची प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे. त्याचबरोबर अयोध्येचं राम मंदिर सुद्धा साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे.
advertisement
अयोध्येत घुमणार पिंपरी-चिंचवडचा ‘चौघडा’; ‘या’ व्यक्तीला विशेष निमंत्रण Video
आम्ही दरवर्षीच साई मंदिरामध्ये वेगवेगळ्या विषय हाती घेऊन रांगोळी काढत असतो. जसे पर्यावरण, बेटी बचाव आणि कोरोनामध्ये देखील असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही रांगोळी काढली होती. यावर्षी अयोध्येचा राम मंदिराचा विषय ज्वलंत असल्यामुळे आम्ही त्या संकल्पनेवर ही रांगोळी काढली आहे. आजची ही रांगोळी 25 बाय 30 फूट अशा आकारामध्ये काढली असून टोटल 18 कलाकारांनी मिळून ही रांगोळी साकारली आहे, अशी माहिती रांगोळी कलाकार वृषाली हिवसे यांनी दिली.
advertisement
200 किलो रांगोळीचा उपयोग
आम्हाला ही रांगोळी साकारण्याकरिता 11 ते 12 तास लागलेले आहेत. तसेच प्रभू श्रीरामांचे मंदिर अयोध्येत बनत असून 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आपल्या भारतीयांसाठी गौरवाची बाब आहेच. त्यामुळे प्रभू श्रीरामांची भव्य अशी प्रतिमा आम्ही स्वतःच्या हाताने नवीन वर्षानिमत्त साई मंदिरातच्या पवित्र ठिकाणी काढली. यात आम्हाला खूप समाधान मिळालं असून आमच्यासाठी खूप आनंददायी बाब आहे. ही रांगोळी काढण्यासाठी अंदाजे 200 किलो रांगोळीचा उपयोग केला गेला आहे, असं कलाकार लोकेश भुरसे यांनी सांगितलं.
advertisement
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीलाच का? पुण्यातील 'त्या' ज्योतिषाने ठरवला शुभ मुहूर्त
view commentsप्रभू श्री रामनामाचा गजर संपूर्ण भारतभरात दिसून येतोय आणि अयोध्येचा राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे आगमनाची उत्सुकता सर्वांना लागली असून वर्धात देखील आनंद साजरा केला जातोय. त्यामुळे रांगोळी कलाकार वृषाली हिवसे, गौरव डेहनकर, लोकेश भुरसे, चित्रा चवरे, निलेश इंगोले, प्रज्वल हिवरे, सारिका काळे, शुभांगी कुर्जेकर, आकाश पाटमासे, शुभांगी पोहाने, अमोल चवरे, प्रतीक्षा राऊत,अ श्विनी गावंडे, समीर गुरनुले, दिनेश राऊत, साहिल गुरनुले, नंदन हिवसे या रांगोळी कलाकारांनी मिळून अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर आणि श्रीरामाची आकर्षक प्रतिमा साकारली आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
January 01, 2024 11:08 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवीन वर्षानिमित्त काढण्यात आली प्रभू श्रीरामांची 25 फुटांची रांगोळी; वर्ध्यातील साईबाबा मंदिरातील पाहा आकर्षक Video

