Vastu Tips In Marathi: वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा कोणत्या दिशेला हवा? जाणून घेऊयात यामागची कारणं !

Last Updated:

Vastu Tips : आपण एखादे घर किंवा वास्तू घेण्यासाठी लाखो रूपये खर्च करतो. पण ती वास्तू आपल्याला फलदायी आहे का हे जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का ?

News18
News18
आपले घर ही केवळ चार भिंतींची इमारत नाही, तर दिवसभराच्या कामाच्या धावपळीने थकल्या भागल्या जीवाला विसावा देणारी अशी वास्तू म्हणजे घर. पण अनेकदा घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न झाल्याने घरामध्ये नकारात्मक वातावरणाचा शिरकाव होतो व त्याचा परिणाम म्हणजे घरामध्ये सतत लहान मोठ्या अडचणी, आर्थिक नुकसान, तब्येतीच्या तक्रारी वारंवार उदभवू लागतात आणि शांततेच्या व निवाऱ्याच्या ठिकाणीच अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी जाणवू लागतात .
वास्तूशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचे स्वामित्व वेगवेगळ्या देवतेकडे आहे. तसेच प्रत्येक दिशेचे प्रतीके , ग्रह ,तत्व आणि वेगवेगळे रंग सांगितले गेले आहेत. जर दिशा लक्षात न घेता वास्तूची रचना करण्यात आली, तर या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते व म्हणूनच वास्तूची रचना करताना आणि घरामध्ये वस्तूंची मांडणी करताना दिशा लक्षात घेणे अत्यंत गरजेचे असते.
advertisement
पूर्व दिशेचा स्वामी इंद्र तर पश्चिमेचा स्वामी वरूण, उत्तरेचा स्वामी कुबेर व दक्षिणेचा स्वामी यम आहेत
जाणून घेऊया दक्षिण दाराचे परिणाम
वास्तूशास्त्रानुसार दक्षिण दिशेचा स्वामी यम असून या दिशेचा ग्रह मंगळ आहे जर आपल्या पत्रिकेनुसार मंगळ शुभफलदायी नसेल तर दक्षिणाभिमुख वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बाबतीत सतत काही ना काही आर्थिक अडचणी, तब्येतीच्या तक्रारी उदभवत असतात.
advertisement
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तरी अनेक चांगले परिणाम मिळतात.
ऊर्जा दोन प्रकारची असते - चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. अनेक वेळा लोकांच्या बोलण्यातून हे वाक्य ऐकायला येत असते काय अवदसा घरात आलीय बोलीभाषेतील ही अवदसा ( पिडा ) म्हणजेच निगेटीव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी , सुख , प्रगती होय. चांगल्या वैश्‍विक ऊर्जेचं घरात आगमन व्हावं म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
advertisement
घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर पाँझिटीव्ह एनर्जी म्हणजे सुख-समृद्धी (लक्ष्मी) घरात येते. आपल्या घरात आयु, आरोग्य , कल्याण , मांगल्य, यश प्राप्ती होते, भाग्योदय होतो, असं वास्तुशास्त्र मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो.
या दक्षिण दारातून जेव्हा नकारात्मक उर्जा घरात आल्याची प्रचीती येते,तेव्हा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घरात होवू लागतात. घरात पैसा येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरात सतत आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात , भांडणे, वादविवाद , घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार बिघडतात अशा घरातील जास्तीत जास्त पैसा शरीर बरे करण्यासाठी किंवा यंत्र दुरुस्तीसाठी होतो.
advertisement
घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचा चेहरा (मुख) आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचे आरोग्य बिघडवते. अगदी त्याचप्रमाणे दूषित व नकारात्मक उर्जा आपल्या घराचं स्वास्थ्य बिघडवतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips In Marathi: वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा कोणत्या दिशेला हवा? जाणून घेऊयात यामागची कारणं !
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement