भारतात वर्ल्ड कप जिंकून माज दाखवला, आता ग्रह फिरले, ऑस्ट्रेलियन दिग्गजावर निवृत्तीची वेळ आली!

Last Updated:

ऑस्ट्रेलियन टीम सध्या इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात ऍशेस सीरिज खेळत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

भारतात वर्ल्ड कप जिंकून माज दाखवला, आता ग्रह फिरले, ऑस्ट्रेलियन दिग्गजावर निवृत्तीची वेळ आली!
भारतात वर्ल्ड कप जिंकून माज दाखवला, आता ग्रह फिरले, ऑस्ट्रेलियन दिग्गजावर निवृत्तीची वेळ आली!
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियन टीम सध्या इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात ऍशेस सीरिज खेळत आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे, त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्शने रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मार्श आता ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेट शेफील्ड शिल्ड स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. तो वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळायचा.
मिचेल मार्शने राज्य स्तरीय रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे त्याच्या टेस्ट क्रिकेटच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऍशेस सीरिजमध्ये त्याच्या खेळण्याची अपेक्षा होती, पण असं झालं नाही. मिचेल मार्शची मागच्या काही काळातील कामगिरी फार चांगली नव्हती, त्यामुळे त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. 2019 नंतर मार्शने फक्त 9 प्रथम श्रेणी मॅच खेळल्या. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरच्या टीमचा प्रमुख सदस्य आहे, तसंच तो जगभरात टी-20 लीगही खेळतो. रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे आता मिचेल मार्शची ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीममध्ये निवड होणंही जवळपास अशक्य झालं आहे.
advertisement

ट्रॉफीवर पाय ठेवल्यामुळे वाद

ऑस्ट्रेलियाने 2023 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता, त्यानंतर मिचेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवून फोटो काढला होता. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मिचेल मार्शवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तसंच मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही ट्रॉफी जिंकली नाही, अशी टीका चाहत्यांनी केली. वनडे वर्ल्ड कपनंतर टी-20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल या तीन स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला नाही.
advertisement

मार्शची कारकिर्द

मिचेल मार्शने 2009 साली वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं होतं. मार्शने त्याच्या करिअरमध्ये 46 टेस्ट मॅच खेळल्या ज्यात त्याने 2083 रन केले, ज्यात 9 अर्धशतकं आणि 3 शतकांचा समावेश होता. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाकडून 99 वनडे आणि 81 टी-20 मॅच खेळल्या, ज्यात त्याने 3098 आणि 2083 रन केले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
भारतात वर्ल्ड कप जिंकून माज दाखवला, आता ग्रह फिरले, ऑस्ट्रेलियन दिग्गजावर निवृत्तीची वेळ आली!
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement