Ind vs Aus : कांगारुंसमोर लोटांगण, संघाला तिघांनी दोनदा गुंडाळलं, WTC पॉइंट टेबलमध्येही उलथापालथ

Last Updated:

ऑस्ट्रेलियाने या विजयासह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-१ अशी बरोबरी केलीय. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.

News18
News18
IND vs AUS 2nd test Report : पर्थ कसोटीत जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला होता. पण एडलेडमध्ये कांगारुंच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी कोलमडली. ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून भारतीय संघाचा पराभव केला. गुलाजी चेंडूने खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज एक दिवसही खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने या विजयासह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-१ अशी बरोबरी केलीय. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. भारतीय संघ यामुळे दुसऱ्या स्थानावर घसरला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबरला एडलेडच्या मैदानावर सुरू झाला. पाच दिवसांची डे-नाइट कसोटी फक्त अडीच दिवसात संपली. गुलाबी चेंडूने खेळलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली. पहिल्या डावात १८० तर दुसऱ्या डावात भारतीय संघ फक्त १६७ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाच्या फक्त तीन गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दोन्ही डावात मिळून तिघांनी २० विकेट घेतल्या. यात स्टार्कने ८, कमिन्सने ७ आणि बोलंडने पाच विकेट घेत भारतीय फलंदाजीचं कंबरंड मोडलं.
advertisement
दोन्ही डावात मिळून भारतीय संघाने ८१ षटके खेळून काढली. कसोटी सामन्यात एका दिवसात ९० षटके खेळली जातात. भारतीय संघाला असा एक दिवसही खेळता आला नाही. दोन्ही डावात मिळून ९० षटके भारतीय फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले नाही. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतीय संघाला ४४.१ षटकात बाद केलं. तर दुसरा डाव ३६.५ षटकातच आटोपला.
advertisement
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ३३७ धावा करत १५७ धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाना दुसऱ्या दिवस अखेर ५ बाद १२८ धावा करता आल्या होत्या. तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत बाद होताच लागोपाठ विकेट पडल्या. पंत दुसऱ्या दिवशी एकही धाव न काढता बाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी यानं केलेल्या फलंदाजीमुळे डावाने पराभव टाळता आला. नितीशकुमारने दुसऱ्या डावात ४२ धावा केल्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Aus : कांगारुंसमोर लोटांगण, संघाला तिघांनी दोनदा गुंडाळलं, WTC पॉइंट टेबलमध्येही उलथापालथ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement