GST Slab Rate : मोदी सरकारने लावली BCCI च्या खिशाला कात्री, IPL तिकीटं महागणार! कोणते मोठे बदल होणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
GST Slab Changes IPL tickets : जीएसटी कौन्सिलने क्रीडा आणि संबंधित कार्यक्रमांवरील करांबाबत स्लॅबमध्ये बदल करून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वात मोठा बदल इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये दिसून येईल.
IPL tickets attract in New GST : जीएसटी कौन्सिलने बुधवारी लक्झरी वस्तूंसाठी 40 टक्क्याचा नवीन स्लॅब तयार करण्यास मान्यता दिली, हा कर रचनेतील एक महत्त्वाचा बदल आहे. जरी त्याची अंमलबजावणी तारीख नंतर जाहीर केली जाईल, तरी 5 टक्के आणि 18 टक्क्याचे इतर दोन मुख्य स्लॅब (नवीन जीएसटी स्लॅब) 22 सप्टेंबरपासून लागू होतील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अशातच आता क्रिडाप्रेमींना मोठा फटका बसला आहे.
IPL तिकिटांच्या किमतींवर परिणाम
जीएसटी कौन्सिलने क्रीडा आणि संबंधित कार्यक्रमांवरील करांबाबत स्लॅबमध्ये बदल करून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वात मोठा बदल इंडियन प्रीमियर लीग (IPL) सारख्या क्रिकेट स्पर्धांमध्ये दिसून येईल. आता आयपीएल सारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये प्रवेश तिकिटांवर 40 टक्के जीएसटी आकारला जाईल. याचा थेट परिणाम तिकिटांच्या किमतींवर होईल आणि प्रेक्षकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. तथापि, हा 40 टक्के दर फक्त आयपीएल सारख्या स्पर्धांवर लागू असेल.
advertisement
कोणत्या क्रिडाप्रकारावर 40 टक्के कर
तसेच देशातील मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांवर 40 टक्के जीएसटी लावला जाणार नाही. त्यावर आधीसारखाच 18 टक्के कर असणार आहे. सट्टेबाजी, जुगार, लॉटरी, घोड्यांच्या शर्यती आणि ऑनलाइन मनी गेमिंग, यावर 40 टक्के कर आकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धांच्या प्रेक्षकांवर कोणताही अतिरिक्त भार टाकला जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
advertisement
निर्मला सीतारमण म्हणतात...
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आता बहुतेक गोष्टी 18 टक्के ते 5 टक्के दराच्या दरम्यान असतील. पापयुक्त पदार्थ आणि अतिलक्झरी उत्पादनांवर 40 टक्के कर लागू होईल. त्या म्हणतात की या सुधारणांमुळे सामान्य माणूस, शेतकरी आणि कामगारांना दिलासा मिळेल, तर सरकारने अनावश्यक आणि हानिकारक गोष्टींवर उच्च कर कायम ठेवला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
GST Slab Rate : मोदी सरकारने लावली BCCI च्या खिशाला कात्री, IPL तिकीटं महागणार! कोणते मोठे बदल होणार?


