'देशासाठी आयुष्य द्यायलाही तयार...', भारतात येताच टीम इंडियाचा वाघ गरजला, पाकिस्तानला दिली वॉर्निंग!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, या विजयानंतर खेळाडू भारतामध्ये परतले आहेत.
हैदराबाद : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली, या विजयानंतर खेळाडू भारतामध्ये परतले आहेत. आशिया कपच्या फायनलमध्ये तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयानंतर तिलक वर्माने पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. पाकिस्तानचे खेळाडू मैदानात अपशब्द वापरत होते, पण त्यांना विजय मिळवून आम्ही प्रत्युत्तर दिलं, असं तिलक म्हणाला आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये तिलकने नाबाद 69 रनची खेळी केली, त्यामुळे रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला.
काय म्हणाला तिलक वर्मा?
'सुरुवातीला थोडा दबाव आणि तणाव होता, पण मी माझ्या देशाला प्रथम स्थान दिले, देशासाठी मी जिंकू इच्छित होतो. मला माहित होते की जर मी दबावाला बळी पडलो तर मी स्वतःला आणि देशातील 140 कोटी लोकांना निराश करेन. मी सुरुवातीच्या काळात माझ्या प्रशिक्षकांकडून शिकलेल्या मूलभूत गोष्टींवर विश्वास ठेवला आणि त्यांचे पालन केले. त्यांना सर्वोत्तम उत्तर म्हणजे आशिया कप जिंकणे आणि आम्ही तेच केले', अशी प्रतिक्रिया तिलकने दिली.
advertisement
बॅटनेच उत्तर दिलं
'ऑपरेशन सिंदूर नंतर, ते आमच्याविरुद्ध खूप आक्रमक झाले. आम्ही खेळ जसा खेळायला हवा तसा खेळून प्रतिसाद दिला. आम्ही लवकर तीन विकेट गमावल्या आणि वातावरण खूपच तापले. मी लवकर बॅटिंग करायला आलो. मी कोणालाही काहीही सांगितले नाही. वाईट शॉट खेळून मी टीमला किंवा देशाला निराश केले नाही', असं तिलक वर्मा म्हणाला.
advertisement
देशासाठी जीव द्यायला तयार
'सामन्यादरम्यान, माझे लक्ष मूलभूत गोष्टींवर होते आणि मी त्यांना उत्तर देऊ इच्छित नव्हतो. मला जे काही सांगायचे होते ते मी सामन्यानंतर सांगितले. सामन्यात असे बरेच काही चालू होते जे मी इथे सांगू शकत नाही. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये हे घडते, पण आमचे लक्ष सामना जिंकण्यावर होते. भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रनची आवश्यकता होती, तोपर्यंत आमच्यावरचा दबाव निघून गेला होता', असं तिलक म्हणाला.
advertisement
'शेवटच्या ओव्हरमध्ये माझ्यावर दबाव नव्हता. मला माहित होते की आपण सामना जिंकू. मी फक्त माझ्या देशाबद्दल विचार करत होतो आणि बॉलनुसार रणनीती आखत होतो. मला अभिमान आहे की मी हे करू शकलो. जर वेळ आली तर मी माझ्या देशासाठी माझे आयुष्यही देऊ शकतो', अशी भावूक प्रतिक्रिया तिलकने दिली. ही माझ्या करिअरमधल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी आहे. मी चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 72 रन केले होते, तीदेखील उत्तम खेळी होती. आशिया कपमध्ये खेळणं आणि तेही दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये खेळणं, ही उत्कृष्ट भावना होती, मी या खेळीला माझी सर्वोत्तम खेळी म्हणेन, असं तिलकने सांगितलं.
Location :
Hyderabad,Telangana
First Published :
September 30, 2025 11:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'देशासाठी आयुष्य द्यायलाही तयार...', भारतात येताच टीम इंडियाचा वाघ गरजला, पाकिस्तानला दिली वॉर्निंग!