पाकिस्तानची शेपूट पुन्हा वाकडी, वर्ल्ड कपच्या सामन्यात काश्मीरबद्दल बरळली, Live कॉमेंट्रीमध्ये मोठा वाद!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आशिया कप 2025 चा वाद अजून शमत नाही तोच आता पाकिस्तान बांगलादेश यांच्यातल्या मॅचवेळी पाकिस्तानी कॉमेंटेटरने ऑन एअर वादग्रस्त विधान केलं आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आशिया कप 2025 चा वाद अजून शमत नाही तोच आता पाकिस्तान बांगलादेश यांच्यातल्या मॅचवेळी पाकिस्तानी कॉमेंटेटरने ऑन एअर वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात महिला वर्ल्ड कपदरम्यान सुरू असलेल्या मॅचवेळी पाकिस्तानची माजी कर्णधार सना मीरने अकलेचे तारे तोडले. पाकिस्तानची बॅटिंग सुरू असताना सना मीरने हे वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानची बॅटर नतालिया परवेझ ही त्यावेळी मैदानात होती. नतालिया परवेझ ही आझाद काश्मीरची असल्याचं सना मीर म्हणाली.
पाकव्याप्त काश्मीर (POK) चा उल्लेख पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणून करतं. पण भारताच्या या भूभागावर पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केला आहे, त्यामुळे भारत या भागाचा उल्लेख कायमच पाकव्याप्त काश्मीर असा करतो.
Player ‘from Azad Kashmir’ is this kind of commentary allowed?
And then they say keep politics away from sports. pic.twitter.com/1HSHjRWMZG
— Lala (@FabulasGuy) October 2, 2025
advertisement
चाहते सना मीरवर संतप्त
सना मीरच्या या विधानामुळे देशभरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. चाहत्यांनी बीसीसीआय आणि आयसीसीला टॅग करून सना मीरला कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. सना मीरच्या या वादग्रस्त विधानावर बीसीसीआय काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयसीसीने खेळामध्ये राजकारण आणण्याविरोधात कठोर नियम स्थापित केले आहेत, त्यातच आता सना मीरने आयसीसीच्या स्पर्धेमध्येच असं विधान केलं आहे, त्यामुळे आयसीसी सना मीरवर कारवाई करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सना मीरने कॉमेंट्री करताना ही चूक जाणूनबुजून केली ही अजाणतेपणे झाली, हे स्पष्ट नाही, पण तिने हे विधान जाणूनबुजून केलं असेल, तर तो आयसीसीच्या नियमानुसार गुन्हा ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2025 11:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानची शेपूट पुन्हा वाकडी, वर्ल्ड कपच्या सामन्यात काश्मीरबद्दल बरळली, Live कॉमेंट्रीमध्ये मोठा वाद!