हातात धनुष्यबाण, ओठी श्रीरामाचे नाव! दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, मैदानात लाखो फॅन्सची गर्दी; VIDEO

Last Updated:

Bobby Deol Ramleela : दिल्लीच्या ‘लव कुश रामलीला’ मैदानात बॉबी देओलने प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारली, रावण दहनात सहभाग घेतला.

News18
News18
मुंबई : देशभरात दसऱ्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, दिल्लीच्या सुप्रसिद्ध ‘लव कुश रामलीला’ मैदानात एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. यावेळी बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने साक्षात प्रभू रामचंद्रांची भूमिका प्रतीकात्मकरित्या साकारत रावण दहनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. बॉबी देओलने हातात धनुष्य-बाण घेऊन रावणरूपी असत्यावर सत्याच्या विजयाचा संदेश देत बाण सोडला आणि लालकिल्ला मैदान ‘जय श्री राम’च्या जयघोषाने दणाणून गेलं!
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मैदानात लाखो चाहते उपस्थित होते. बॉबी देओलसोबत अभिनेता निखिल द्विवेदीदेखील यावेळी उपस्थित होते.
‘लव कुश रामलीला’ समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी सांगितलं की, बॉबी देओल हे धार्मिक वृत्तीचे कलाकार आहेत. त्यांनी आपल्या ३० वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर प्रभू रामचंद्रांच्या शरणेत येण्याचा निर्णय घेतला. समितीच्या निमंत्रणावरून बॉबी देओल या भव्य आयोजनासाठी दिल्लीला आले होते.
advertisement
advertisement

अक्षय, अजयनंतर आता बॉबीची उपस्थिती!

अर्जुन कुमार यांनी नमूद केलं की, यापूर्वीही अनेक मोठे फिल्मी तारे लव कुश रामलीलाचा भाग बनले आहेत. यात अजय देवगन, करीना कपूर, रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार प्रभाससह अनेक कलाकारांनी प्रभू रामचंद्रांप्रति आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.
बॉबी देओलच्या उपस्थितीमुळे या समारंभाची शान आणि लोकांचा सहभाग आणखी वाढला, असं समितीने म्हटलं आहे. रावण दहन ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची पौराणिक परंपरा आहे आणि बॉबी देओलनेही याचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
मराठी बातम्या/मनोरंजन/
हातात धनुष्यबाण, ओठी श्रीरामाचे नाव! दिल्लीत बॉबी देओलच्या हस्ते रावण दहन, मैदानात लाखो फॅन्सची गर्दी; VIDEO
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement