IND vs AUS : गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डच्चू, गिल घेणार बोल्ड डिसिजन, दुसऱ्या वनडेसाठी भारताची Playing XI!

Last Updated:

रविवारी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला, यानंतर आता दोन्ही टीममधील दुसरी वनडे गुरूवार 23 ऑक्टोबरला अॅडलेडमध्ये होणार आहे.

गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डच्चू, गिल घेणार बोल्ड डिसिजन, दुसऱ्या वनडेसाठी भारताची Playing XI!
गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डच्चू, गिल घेणार बोल्ड डिसिजन, दुसऱ्या वनडेसाठी भारताची Playing XI!
मुंबई : रविवारी पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला, यानंतर आता दोन्ही टीममधील दुसरी वनडे गुरूवार 23 ऑक्टोबरला अॅडलेडमध्ये होणार आहे. पावसामुळे प्रभावित झालेला पहिला सामना 26 ओव्हरचा झाला, ज्यात टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 136 रन केल्या, यानंतर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 131 रनचं आव्हान मिळालं, हे आव्हान ऑस्ट्रेलियाने अगदी सहज पार केलं. आता दुसऱ्या सामन्यात कामगिरी सुधारण्याचं आव्हान भारतीय टीमकडे असेल.

विराट-रोहित फेल

पर्थमध्ये विराट कोहली शून्य रनवर आणि रोहित शर्मा 8 रन करून आऊट झाला, त्यामुळे ऍडलेडमध्ये हे दोन्ही खेळाडू धमाका करण्यासाठी मैदानात उतरतील. या सामन्यात भारताची बॅटिंग लाईनअप तशीच राहिल, पण बॉलिंगमध्ये बदल व्हायची शक्यता आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कुलदीप यादवला स्थान दिलं नव्हतं, पण ऍडलेडमध्ये त्याचं टीम इंडियात कमबॅक होऊ शकतं. आता कुलदीपसाठी कुणाचा बळी जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वॉशिंग्टन सुंदर हा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणण्यासाठी नितीश कुमार रेड्डीला बाहेर बसावं लागू शकतं.
advertisement
याशिवाय हर्षित राणालाही डच्चू दिला जाऊ शकतो. हर्षित राणा पहिल्या सामन्यात बॉलिंग आणि बॅटिंगमध्येही अपयशी ठरला होता, तसंच त्याच्या टीममधल्या समावेशावरून आधीच मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. हर्षितऐवजी प्रसिद्ध कृष्णा दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकतो. 29 वर्षांच्या प्रसिद्ध कृष्णाने आतापर्यंत भारताकडून 17 वनडे खेळल्या आहेत, यात त्याने 29 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल 2025 मध्ये प्रसिद्ध कृष्णा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता, त्यामुळे त्याला पर्पल कॅपचा पुरस्कार मिळाला होता. इंग्लंडमधल्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला, त्यातही प्रसिद्ध कृष्णाने मोलाची भूमिका बजावली.
advertisement

जयस्वाल-जुरेल बेंचवर

यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल हेदेखील भारतीय टीममध्ये आहेत, पण बॅटिंग लाईनअपमध्ये कोणताही बदल होणार नसल्यामुळे दोघांनाही ऍडलेडमध्येही बेंचवरच बसावं लागू शकतं.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डच्चू, गिल घेणार बोल्ड डिसिजन, दुसऱ्या वनडेसाठी भारताची Playing XI!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement