IND VS BAN : बांगलादेशच्या खेळाडूने का मागितली विराटची माफी? मैदानात नेमकं काय घडलं
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सामना सुरु झाल्यावर बांगलादेशच्या एका खेळाडूने फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीची माफी मागितली.
मुंबई : शनिवारी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टी 20 वर्ल्ड कपचा सुपर 8 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. सामना सुरु झाल्यावर बांगलादेशच्या एका खेळाडूने फलंदाजी करत असलेल्या विराट कोहलीची माफी मागितली.
अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर यांच्यात भारत विरुद्ध बांगलादेश सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाकडून फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी मैदानात उतरली. यावेळी बांगलादेशकडून मेहंदी हसन हा पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रोहितने एकेरी धाव घेतली आणि विराट स्ट्राईकवर आला. विराटला मागील काही सामन्यात टीमसाठी मोठी खेळी करता आली नाही त्यामुळे तो बांगलादेशी बॉलर्सना आपल्या फलंदाजीने चोख उत्तर देण्याच्या तयारीत होता. कोहलीने यावेळी पहिल्या चेंडूवर मिड विकेटला फटका मारला. कोहली यावेळी पहिल्या बॉलवर धाव घेण्यासाठी पळाला. पण बांगलादेशचा अनुभवी खेळाडू महमुदुल्लाह मध्ये आला आणि त्याने बॉल पकडला त्यामुळे विराटला ही धाव घेणे शक्य झाले नाही त्यामुळे तो माघारी परतला.
advertisement
विराट माघारी परतत असताना महमुदुल्लाहने हातातील बॉल विराटच्या दिशेने फेकला. मात्र नशिबाने बॉल विराटला लागला नाही आणि त्याच्या खूप जवळून गेला. विराट यावेळी थोडाजरी हलला असता तर बॉल विराटला लागला असता. महमुदुल्लाह याला त्याची चूक कळाली आणि त्याने ती कबूल करून विराटची भर मैदानात माफी मागितली. विराटला बॉल लागला असता तर त्याला दुखापत झाली असती आणि या प्रकाराला वेगळाच रंग चढला असता. मात्र महमुदुल्लाह विराटची माफी मागून विषय संपवला.
advertisement
विराट कोहलीने या सामन्यात 28 बॉलमध्ये 37 धावा केल्या. तर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 196 धावांचा स्कोअर उभा केला. यामुळे बांगलादेशला विजयासाठी 197 धावांचे आव्हान मिळाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 22, 2024 9:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS BAN : बांगलादेशच्या खेळाडूने का मागितली विराटची माफी? मैदानात नेमकं काय घडलं










