IND vs ENG : बुमराहच्या धमाक्यानंतर राहुलची टिच्चून बॅटिंग, भारत-इंग्लंड टेस्ट रोमांचक अवस्थेत

Last Updated:

भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू असलेली पहिली टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 90/2 एवढा झाला आहे.

बुमराहच्या धमाक्यानंतर राहुलची टिच्चून बॅटिंग, भारत-इंग्लंड टेस्ट रोमांचक अवस्थेत
बुमराहच्या धमाक्यानंतर राहुलची टिच्चून बॅटिंग, भारत-इंग्लंड टेस्ट रोमांचक अवस्थेत
लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू असलेली पहिली टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 90/2 एवढा झाला आहे. केएल राहुल 47 रनवर नाबाद तर कर्णधार शुभमन गिल 6 रनवर खेळत आहे. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा 465 रनवर ऑलआऊट केल्यानंतर भारताला 6 रनची आघाडी मिळाली, त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारताची आघाडी 96 रनपर्यंत पोहोचली आहे.
दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आल्यानंतर टीम इंडियाला सुरूवातीलाच धक्का बसला. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणारा यशस्वी जयस्वाल फक्त 4 रन करून आऊट झाला. ब्रायडन कार्सने जयस्वालची विकेट घेतली. तर पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झालेला साई सुदर्शन 30 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यातून साई सुदर्शनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे, पण पहिल्याच सामन्यात साई सुदर्शनच्या पदरी निराशा आली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये बेन स्टोक्सने साई सुदर्शनची विकेट घेतली.
advertisement
त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडचा 465 रनवर ऑल आऊट केला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर प्रसिद्ध कृष्णाला 3 आणि मोहम्मद सिराजला 2 विकेट मिळाल्या. इंग्लंडकडून ओली पोपने 106, हॅरी ब्रुकने 99 आणि बेन डकेटने 62 रनची खेळी केली. या तीनही खेळाडूंना भारतीय फिल्डरनी जीवनदान दिली. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फिल्डरनी तब्बल 6 कॅच सोडले, ज्याच्यामुळे इंग्लंडला एवढी मजल मारता आली.
advertisement
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 471 रनचा डोंगर उभारला. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्या शतकांच्या जोरावर भारताला एवढ्या मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. एकवेळ भारताचा स्कोअर 500 रनपर्यंत जाईल, असं वाटत होतं, पण भारताच्या तळाच्या बॅटरनी निराशाजनक कामगिरी केली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : बुमराहच्या धमाक्यानंतर राहुलची टिच्चून बॅटिंग, भारत-इंग्लंड टेस्ट रोमांचक अवस्थेत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement