IND vs NZ : जडेजासह आणखी एकाला डच्चू, कॅप्टन गिलचं धक्कातंत्र, तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात 2 बदल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या सीरिजमधील तिसरा वनडे सामना रविवार 18 जानेवारीला खेळवला जाणार आहे.
इंदूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या सीरिजमधील तिसरा वनडे सामना रविवार 18 जानेवारीला खेळवला जाणार आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय टीम प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वनडेमध्ये फक्त एक विकेट घेणाऱ्या रवींद्र जडेजाला या सामन्यातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये जडेजाला एकही विकेट मिळाली नव्हती, तसंच राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात जडेजाने बॅटिंगमध्येही खराब कामगिरी केली होती, त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
रवींद्र जडेजाच्या ऐवजी आयुष बदोनीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानंतर आयुष बदोनीची टीम इंडियात निवड झाली आहे. ऑलराऊंडर असलेला आयुष बदोनी हा त्याच्या स्पिन बॉलिंगनेही योगदान देऊ शकतो. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा बदोनी कॅप्टन गिलसाठी सहावा बॉलिंग पर्याय ठरू शकतो. बदोनी व्यतिरिक्त डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगलाही संधी मिळू शकते.
advertisement
अर्शदीप सिंग हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. पण तरीही पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला बेंचवर बसावं लागलं होतं. अर्शदीपच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला प्राधान्य देण्यात आलं होतं, पण त्याला न्यूझीलंडच्या बॅटरना रोखण्यात अपयश आलं.
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि विकेट कीपर केएल राहुल यांची टीममधली जागा निश्चित आहे. तसंच ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डीलाही आणखी एक संधी मिळेल. दुसऱ्या वनडेमध्ये 10 ओव्हरमध्ये 82 रन देऊनही कुलदीप यादवच्या स्थानाला कोणताही धोका नाही. पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. सीरिज जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे.
advertisement
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, आयुष बदोनी, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
Jan 17, 2026 10:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : जडेजासह आणखी एकाला डच्चू, कॅप्टन गिलचं धक्कातंत्र, तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात 2 बदल!










