IND vs SA 1st T20 : शुभमन गिलचं कमबॅक पण 9 वनडे खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू, संजूला संधी मिळणार का?

Last Updated:

India vs South Africa 1st T20I : टीम इंडियाच्या 9 वनडे प्लेयर्सला घरी पाठवण्यात आलं असून गौतम गंभीरसह टीम इंडियाचे दोन खेळाडू थेट कटकला रवाना झाले आहेत.

India vs South Africa 1st T20I
India vs South Africa 1st T20I
India vs South Africa 1st T20I : कसोटी मालिका गमावल्यानंतर आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष टी-ट्वेंटी मालिकेवर असणार आहे. मंगळवारपासून पाच सामन्याची टी-ट्वेंटी मालिका खेळवली जाईल. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी ही लिटमस टेस्ट असेल. अशातच कटकमधील बाराबती स्टेडियमवर टीम इंडियात 9 नवीन जणांची निवड झाली आहे. शुभमन गिलचं कमबॅक झालं असताना तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळलेले नऊ खेळाडू पहिल्या सामन्यातून बाहेर पडले आहेत.

गंभीरसह दोनच खेळाडू रवाना

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा या वनडे खेळणाऱ्या खेळाडूंना आता घरी पाठवण्यात आलं असून गौतम गंभीरसह टीम इंडियाचे दोन खेळाडू थेट कटकला रवाना झाले आहेत.

टीम इंडियात 9 खेळाडूंची एन्ट्री

advertisement
टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळेल. शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या 9 खेळाडूंना टीम इंडियाच्या आगामी सामन्यात कटकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

पहिला टी-ट्वेंटी सामना कधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-ट्वेंटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 6:30 वाजता होणार आहे. भारतीय संघाने या मैदानावर खेळलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे, जो 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध होता. भारताने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एक जिंकला आहे आणि एक हरला आहे.
advertisement
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 1st T20 : शुभमन गिलचं कमबॅक पण 9 वनडे खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू, संजूला संधी मिळणार का?
Next Article
advertisement
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement