IND vs SL 1st ODI Dream11 prediction: या खेळाडूला करा कॅप्टन, मिळवून देईल 2 कोटी
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
सर्वोत्तम टीम कॉम्बिनेशनचे प्रयोग या सीरिजमध्ये होऊ शकतात. ही सीरिज जिंकणं हे उद्दिष्ट तर आहेच शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचं मोठे ध्येय देखील विचारात घेतलं जाईल.
भारतीय क्रिकेट टीम सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन मॅचेसची टी-20 सीरिज झाली. ही सीरिज भारताने 3-0 अशा फरकाने जिंकली. आता दोन्ही देशांदरम्यान वन-डे सीरिज होणार आहे. पहिली वन-डे 2 ऑगस्टला (शुक्रवार) कोलंबो येथे खेळली जाणार आहे. वन-डे सीरिजसाठी टीममध्ये काही बदल केले असले तरीही टी-20 सीरिज विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. कारण, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोजक्याच वन-डे मॅचेस खेळणार आहे. त्यामुळे सर्वोत्तम टीम कॉम्बिनेशनचे प्रयोग या सीरिजमध्ये होऊ शकतात. ही सीरिज जिंकणं हे उद्दिष्ट तर आहेच शिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचं मोठे ध्येय देखील विचारात घेतलं जाईल.
श्रीलंकेला त्यांच्या चार प्रमुख फास्ट बॉलर्सची उणीव भासेल. त्याच्या टीममध्ये काही नवीन खेळाडूंचा समावेश असल्याने भारताच्या तुलनेत त्यांची बाजू काहीशी कमकुवत असेल. तिसऱ्या टी-20 मध्ये सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवामुळे यजमान दु:खी आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्ध सीरिज गमावल्यापासून श्रीलंकेने वन-डे फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही. नेतृत्वातील बदलामुळे टीमच्या नशिबातही बदल होईल, अशी आशा आहे.
advertisement
भारताने हार्दिक पंड्याला विश्रांती दिल्याने रियान पराग आणि शिवम दुबे यांचा ऑलराउंडर खेळाडू म्हणून वापर करता येईल. खलील अहमद आणि हर्षित राणा यांना वन-डे सीरिजमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वन-डेसाठी My Dream11 टीम: पथुम निसांका, कुसल मेंडिस, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, कुलदीप यादव, महिश तीक्ष्णा, अर्शदीपसिंग
advertisement
भारताची संभाव्य प्लेईंग एलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ऋषभ पंत (विकेटकीपर), रियान पराग/शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीपसिंग, खलील अहमद.
श्रीलंकेची संभाव्य प्लेईंग एलेव्हन: पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका (कॅप्टन), जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महिश तीक्ष्णा, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2024 12:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SL 1st ODI Dream11 prediction: या खेळाडूला करा कॅप्टन, मिळवून देईल 2 कोटी