Shubhman Gill : अर्धशतक केल्याचा आनंद 5 मिनिटही टिकला नाही, शुभमनने केली ऋषभ पंतसारखी चूक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs WI Ahmadabad test : चार दिवसांपूर्वी टी-२० सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये परतताच गिअर्स बदलले. अहमदाबादमधील त्याच्या आवडत्या मैदानावर त्याने आठवे कसोटी अर्धशतक पूर्ण केलं.
Shubhman Gill Wicket : टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन शुभमन गिल याने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या नव्या WTC सर्कलची सुरूवात केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत वेस्ट इंडिजवर वर्चस्व निर्माण केलं आहे. एकीकडे केएल राहुलने शतक ठोकल्यानंतर दुसरीकडे शुभमन गिलने देखील अर्शशतक पूर्ण केलं होतं. पण त्याच्या अर्धशतकाचा आनंद पाच मिनिटं देखील टिकू शकला नाही. 57 व्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर काय झालं? पाहा
शुभमन गिलची मोठी चूक
चार दिवसांपूर्वी टी-२० सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये परतताच गिअर्स बदलले. अहमदाबादमधील त्याच्या आवडत्या मैदानावर त्याने आठवे कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. पण पुढच्याच ओव्हरमध्ये शुभमन गिलने मोठी चूक केली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच शुभमनने विकेट फेकली. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करताना, रोस्टन चेसच्या बॉलवर पहिल्या स्लिपमध्ये ग्रीव्हजने त्याला कॅच घेतला. 100 बॉलमध्ये 50 धावा काढल्यानंतर गिल बाद झाला, ज्यामुळे वेस्ट इंडिजला दिवसाचा पहिला आनंदाचा क्षण मिळाला. ऋषभ पंत अनेकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तशीच चूक राहुलने देखील केली.
advertisement
Stamping his authority! @ShubmanGill scores his first Test fifty against West Indies as #TeamIndia take the lead.
Catch the LIVE action ➡ https://t.co/JFWO3nYmj8#INDvWI 1st Test, Day 2 LIVE NOW on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/3d3wNvyqqV
— Star Sports (@StarSportsIndia) October 3, 2025
advertisement
India squad for West Indies Test series : शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह
वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस ( कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स, जेडिया ब्लेड्स, जोहान लिन.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 11:31 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubhman Gill : अर्धशतक केल्याचा आनंद 5 मिनिटही टिकला नाही, शुभमनने केली ऋषभ पंतसारखी चूक!