IND vs WI : टीम इंडियाचे 4 खेळाडू ठरले अनलकी,लाहोर ते मुंबईपर्यंत झाला क्रिकेटर्सचा हार्टब्रेक

Last Updated:

यशस्वी जयस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला. इतक्या मोठ्या धावा करताना एखादा खेळाडू रनआऊट होतो हे काही पहिल्यांदा घडलं नाही. जयस्वाल आधी या खेळाडूंच्या बाबतीत हे असचं घडलं होतं.

 yashasvi Jaiswal
yashasvi Jaiswal
India vs West Indies 2nd Test : दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडीअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने आपला पहिला डाव 5 विकेट 518 धावांवर घोषित केला आहे. या धावा करताना भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालला द्विशतक करण्याची संधी होती. पण तो 175 धावांवर रनआऊट झाला. इतक्या मोठ्या धावा करताना एखादा खेळाडू रनआऊट होतो हे काही पहिल्यांदा घडलं नाही. जयस्वाल आधी या खेळाडूंच्या बाबतीत हे असचं घडलं होतं.त्यामुळे लाहोरपासून मुंबईपर्यंत भारतीय फॅन्सचा हार्टब्रेक झाला आहे. त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
खरं तर यशस्वी जयस्वाल आधी अनेक भारतीय खेळाडू असे आहेत ज्यांनी खूप मोठ्या धावा केल्या त्यानंतर ते द्विशतकाच्या उंबरठ्यावर किंवा आसपास होते,त्याचवेळी एका रनआऊटने त्यांचा घात केला होता.त्यामुळे हे खेळाडू अनलकी ठरले होते.
या क्रमवारीत भारताते माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे पहिल्या स्थानी येतात. कारण 1989 मध्ये लाहोरमध्ये पार पडलेल्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात संजय मांजरेकर यांनी 218 धावा केल्या होत्या. या धावा केल्यानंतर ते 250 करतील असे वाटत असताना ते रनआऊट होतात.
advertisement
इंग्लंड विरूद्ध ओव्हलच्या मैदानात भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने 217 धावा केल्या होत्या.या धावा केल्यानंतर राहुल द्रविड 250 करतील असे वाटत असताना तो रनआऊट झाला होता. हा सामना 2002 मध्ये पार पडला होता. त्यामुळे द्रविड या क्रमांकावर दुसऱ्या स्थानी होता.
या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी राहुल द्रविडच आहे. कारण 2001 साली कोलकत्ताच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सामना पार पडला होता.या सामन्यात राहुल द्रविड 180 धावा करून रनआऊट झाला होता.त्यामुळे तो अनलकी ठरला होता.
advertisement
चौथ्या स्थानी कमनशीबी ठरण्यात यशस्वी जयस्वाल आहे. कारण 2025 मध्ये दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर सुरू असलेल्या सामन्यात जयस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला होता.खरं तर जयस्वाल हमखास द्विशतक ठोकू शकला असता पण तो रनआऊट झाला.
पाचवा नंबर हा विजय हजारे यांचा लागतो. कारण 1951 साली मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर इंग्लंडविरूद्ध पार पडलेल्या सामन्यात विजय हजारे 155 धावा करून रनआऊट झाले होते.
advertisement
त्यानंतर सहाव्या स्थानी पुन्हा राहुल द्रविडचा नंबर लागतो. 2009 मध्ये कानपूरच्या मैदानात श्रीलंकेविरूद्ध सूरू असलेल्या सामन्यात द्रविडने 144 धावा केल्या होत्या. त्यामुळे ते 150 धावा करेल असे वाटत होते पण तो रनआऊट वर बाद झाला होता.
त्यामुळे अशाप्रकारे हे भारताचे चार खेळाडू आहेत, जे मोठ्या धावा करूनही रनआऊटवर बाद झाले होते. त्यामुळे हे खेळाडू क्रिकेट वर्तुळात कमनशिबी ठरले होते.
advertisement
सर्वाधिक धावसंख्येवर रनआऊट होणारे भारतीय खेळाडू
218- संजय मांजरेकर विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, 1989
217- राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड, ओव्हल,2002
180- राहुल द्रविड विरुद्ध ऑस्ट्रेलिया,कोलकाता,2001
175 - यशस्वी जयस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज, 2025 मध्ये दिल्ली
155- विजय हजारे विरुद्ध इंग्लंड, मुंबई (ब्रेबॉर्न स्टेडियम) 1951
144- राहुल द्रविड विरुद्ध श्रीलंका, 2009 मध्ये कानपूर
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : टीम इंडियाचे 4 खेळाडू ठरले अनलकी,लाहोर ते मुंबईपर्यंत झाला क्रिकेटर्सचा हार्टब्रेक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement