IND vs WI 2nd Test : कॅप्टन शुभमन गिलने पहिल्यांदाच जिंकला टॉस, दिल्ली टेस्टसाठी कशी आहे Playing XI?

Last Updated:

IND vs WI 2nd Test Playing XI : आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली दिसत आहे. आमच्यासाठी सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे, असं शुभमन गिल म्हणाला.

IND vs WI 2nd Test Playing XI
IND vs WI 2nd Test Playing XI
India vs West indies Delhi Test : भारत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट संघ मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आमनेसामने येत आहेत. हा सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल याने कॅप्टन झाल्यापासून पहिल्यांदाच टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून शुभमन गिलने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला.

काय म्हणाला शुभमन गिल?

आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली दिसत आहे. आमच्यासाठी सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याच तीव्रतेने खेळ करणे आणि चांगला परफॉर्मन्स सातत्याने देणे हे आमच्या टीममध्ये नेहमीच बोलले जाते आणि या कसोटी क्रिकेटमध्ये देखील आम्ही हेच लक्ष्य ठेवले आहे. खरे सांगायचे तर, माझ्यात फारसा बदल झालेला नाही. मी अजूनही तोच माणूस आहे, पण नक्कीच आता माझ्यावर अधिक जबाबदाऱ्या आहेत. परंतु, मला जबाबदाऱ्या आवडतात आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये माझी भूमिका वाढल्यामुळे माझे भविष्य खूप उत्सुक आहे. या कसोटी मॅचसाठी आमच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, आम्ही सेम टीमसोबत मैदानात उतरलो आहोत.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (C), ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (C), टेविन इम्लाच (WK), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 2nd Test : कॅप्टन शुभमन गिलने पहिल्यांदाच जिंकला टॉस, दिल्ली टेस्टसाठी कशी आहे Playing XI?
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement