IND vs WI 2nd Test : 175 धावांवर यशस्वी रनआऊट, नेमकी चूक कोणाची? शुभमन की जयस्वाल? Video पाहून तुम्हीच सांगा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yashasvi Jaiswal Run Out Video : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 318 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला, परंतु संघाने लवकरच यशस्वीची विकेट गमावली.
India vs West Indies 2nd Test : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावण्याच्या जवळ होता. तथापि, शुभमन गिलसोबत एक धाव चोरताना यशस्वी पकडला गेला अन् वेस्ट इंडिजला फुकटात विकेट मिळाली. पण 175 वर यशस्वी रनआऊट झाल्याने नेमकी चूक कुणाची होती? असा सवाल विचारला जात आहे.
खरंच शुभमनची चूक होती का?
यशस्वीच्या रुपात टीम इंडियाचा तिसरा विकेट गेला. यशस्वी 258 बॉलवर 22 फोरसह 175 धावा काढल्यानंतर बाद झाला. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 318 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला, परंतु संघाने लवकरच यशस्वीची विकेट गमावली. धाव घेण्याचा निर्णय यशस्वीचा होता आणि तो पुढे गेला, परंतु गिलच्या 'चुकीने' त्याला द्विशतक गमवावं लागलं, अशी चर्चा सोशल मीडियावर होतीये. पण खरंच शुभमनची चूक होती का?
advertisement
शुभमनने धाव घेतली नाही
यशस्वीने मिड ऑनच्या दिशेने बॉल मारला. त्यामुळे रन घेयचा की नाही, हे स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूचा कॉल असतो. यशस्वीने पळ म्हणून घाई केली अन् शुभमनने धाव घेतली नाही. यशस्वी जरी पाळाला असता तरी देखील नॉन स्ट्राईक एन्डवर पोहोचला नसता. तसेच शुभमन देखील स्ट्राईकवर पोहोचला नसता. त्यामुळे धाव नसताना यशस्वी का पळाला? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
Mindless running from Jaiswal after hitting straight to fielder resulting in run out.
He did the same thing in Melbourne too when he was batting with Virat Kohli.
Bottled an easy 100 there & now a 200 here#YashasviJaiswal #INDvWI #TeamIndia pic.twitter.com/BvKygFeKUL
— Prateek (@prateek_295) October 11, 2025
advertisement
ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसला
दरम्यान, यशस्वी त्याच्या बाद झाल्यावर खूप निराश दिसत होता आणि काही काळ गिलवर रागही व्यक्त करत होता. शेवटी, तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसलेला दिसला. त्यामुळे आपलीच चूक होती, याची जाणीव त्याला झाली असावी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 2nd Test : 175 धावांवर यशस्वी रनआऊट, नेमकी चूक कोणाची? शुभमन की जयस्वाल? Video पाहून तुम्हीच सांगा!