IPL 2025 : शाहरुखच्या टीममध्ये डिनरवरून बाचाबाची, KKR च्या खेळाडूंचं कोचच्या विरोधात बंड

Last Updated:

आयपीएल 2025 मध्ये शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे.

शाहरुखच्या टीममध्ये डिनरवरून बाचाबाची, KKR च्या खेळाडूंचं कोचच्या विरोधात बंड
शाहरुखच्या टीममध्ये डिनरवरून बाचाबाची, KKR च्या खेळाडूंचं कोचच्या विरोधात बंड
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. केकेआरची टीम प्ले-ऑफच्या रेसमधून जवळपास बाहेर गेली आहे, त्यातच आता केकेआरच्या खेळाडूंनी टीमचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याविरोधात बंड केल्याचं वृत्त समोर आलं आहे. चंद्रकांत पंडित यांचा केकेआरच्या खेळाडूसोबत डिनरवरून वाद झाला. रेवस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रकांत पंडित यांचं केकेआरमधल्या परदेशी खेळाडूसोबत भांडण झालं.
केकेआरचा हा परदेशी खेळाडू आणि विरोधी टीमचा परदेशी खेळाडू एकाच देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात, पण तरीही चंद्रकांत पंडित यांचे केकेआरच्या खेळाडूसोबत वाद झाले. याचसोबत चंद्रकांत पंडित यांच्या कार्यशैलीवर अनेक खेळाडू खूश नसल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
चंद्रकांत पंडित यांचा 500 रुपयांचा नियम
चंद्रकांत पंडित यांनी केकेआरच्या टीमसाठी खास नियम तयार केला आहे. टीम डिनरसाठी जे खेळाडू उशिरा येतील, त्यांना 500 रुपयांचा दंड लावला जाईल, असा नियम चंद्रकांत पंडित यांनी बनवला आहे. टीममधील एकी वाढवण्यासाठी हा नियम बनवण्यात आला असला तरी अनेक क्रिकेटर या निर्णयामुळे खूश नसल्याचंही या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.
advertisement

केकेआरला जाणवतेय गंभीरची कमी

गौतम गंभीर मागच्या मोसमात केकेआरचा मेंटर होता तेव्हा केकेआरने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, पण त्यानंतर गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक करण्यात आलं. तर अभिषेक नायर टीम इंडियाचा असिस्टंट कोच बनला. अभिषेक नायरनेही केकेआरला मागच्या मोसमात चॅम्पियन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मागच्या मोसमातही चंद्रकांत पंडित केकेआरच्या कोचिंग स्टाफचा भाग होते, पण केकेआरच्या विजयाचं फार श्रेय त्यांना मिळालं नाही. या मोसमात चंद्रकांत पंडित केकेआरचे सर्वेसर्वा असताना टीम खराब कामगिरी करत आहे. काहीच दिवसांपूर्वी हर्षीत राणाने टीमला गौतम गंभीरची कमी जाणवत असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
'आमचा सपोर्टिंग स्टाफ मागच्यावेळसारखाच आहे. अभिषेक नायरचं पुनरागमन झालं आहे. चंदू सर, ब्राव्हो सगळेच उत्कृष्ट आहेत, पण काहीतरी कमी आहे. मी दुसऱ्या कुणाबद्दल बोलत नाहीये, गौतम गंभीरचा ऑरा काय आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तो कशाप्रकारे टीमला घेऊन पुढे जातो, मी त्याबद्दलच बोलत आहे', अशी प्रतिक्रिया हर्षीत राणाने दिली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : शाहरुखच्या टीममध्ये डिनरवरून बाचाबाची, KKR च्या खेळाडूंचं कोचच्या विरोधात बंड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement