IPL 2025 : शतक केलं पण फुकट गेलं, केएल राहुल ठरला दिल्लीचा व्हिलन, बापूचं जहाज बुडवलं!

Last Updated:

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवला आहे. दिल्लीने दिलेलं 200 रनचं आव्हान गुजरातने 19 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं.

शतक केलं पण फुकट गेलं, केएल राहुल ठरला दिल्लीचा व्हिलन, बापूचं जहाज बुडवलं!
शतक केलं पण फुकट गेलं, केएल राहुल ठरला दिल्लीचा व्हिलन, बापूचं जहाज बुडवलं!
नवी दिल्ली : आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवला आहे. दिल्लीने दिलेलं 200 रनचं आव्हान गुजरातने 19 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं. साई सुदर्शनने 61 बॉलमध्ये नाबाद 108 रन केल्या तर शुबमन गिलने 53 बॉलमध्ये नाबाद 93 रन केले. या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 199 रन केले.
ओपनिंगला आलेल्या केएल राहुलने 65 बॉलमध्ये नाबाद 112 रन केले, त्याच्या या खेळीमध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर अभिषेक पोरेलने 19 बॉलमध्ये, अक्सर पटेलने 16 बॉलमध्ये 25 आणि ट्रिस्टन स्टब्सने 10 बॉलमध्ये नाबाद 21 रन केले. केएल राहुलने शतकी खेळी केली असली तरी दिल्लीच्या पराभवाला तोच जबाबदार असल्याचं म्हणावं लागेल, कारण केएल राहुलने शेवटच्या बॉलपर्यंत बॅटिंग करून 172.31 च्या स्ट्राईक रेटने रन केल्या.
advertisement
केएल राहुल शेवटच्या बॉलपर्यंत खेळल्यामुळे दिल्लीचे फिनिशिर असलेले समीर रिझवी, आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांना बॅटिंगची संधीच मिळाली नाही. आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांनी आयपीएलच्या यंदाच्या मोसमात तळाला येऊन 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने आपण बॅटिंग करू शकतो हे दाखवून दिलं आहे, पण केएल राहुलमुळे या दोघांनाही बॅटिंगची संधी मिळाली नाही.
advertisement
दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचणं संकटात
गुजरातविरुद्धच्या या पराभवामुळे दिल्लीचं प्ले-ऑफला पोहोचणं आणखी अवघड झालं आहे. दिल्लीला आता प्ले-ऑफला पोहोचायचं असेल तर त्यांना त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत, तसंच मुंबई त्यांचे उरलेले दोन सामने जिंकणार नाही हेदेखील पाहावं लागणार आहे. मुंबईचे उरलेले दोन सामने दिल्ली आणि पंजाबविरुद्ध आहेत, तर दिल्लीही त्यांच्या उरलेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई आणि पंजाबविरुद्ध खेळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : शतक केलं पण फुकट गेलं, केएल राहुल ठरला दिल्लीचा व्हिलन, बापूचं जहाज बुडवलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement