IPL 2026 Auction : आयपीएल ऑक्शनचा वेन्यू ठरला,तिसऱ्यांदा भारताबाहेर होणार लिलाव? तारीखही आली समोर

Last Updated:

आयपीएल 2026 चा हंगाम सुरू व्हायला अजून खूप अवकाश आहे. पण त्याआधी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे.या लिलावाचे ठिकाण आणि तारीख आता समोर आली आहे.

IPL 2026 Mini Auction
IPL 2026 Mini Auction
IPL 2026 Mini Auction : आयपीएल 2026 चा हंगाम सुरू व्हायला अजून खूप अवकाश आहे. पण त्याआधी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे.या लिलावाचे ठिकाण आणि तारीख आता समोर आली आहे.त्यानुसार आता तिसऱ्यांदा भारताबाहेर म्हणजे
अबु धाबीत लिलाव पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत या लिलावाची आता तारीखही समोर आली आहे.
आयपीएल 2026च्या हंगामासाठी सध्या ट्रेड सूरू आहे.त्यानंतर काही दिवसांनी आयपीएलचे संघ आपआपली रिटेन्शन यादी जाहीर करणार आहेत. या यादीनंतर जो खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे तो डिसेंबरमध्ये अबू धाबीमध्ये होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी याची घोषणा केली आहे.
advertisement
खरं तर दुबई (2023) आणि जेद्दाह (2024)असे दोनदा भारताबाहेर लिलाव पार पडला होता.त्यानंतर परदेशात सलग तिसऱ्यांदा लिलाव होणार आहे. "अबू धाबीची लिलाव स्थळ म्हणून निवड करण्यात आली आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
लिलाव कधी होईल?
आयपीएल 2026 चा लिलाव 15 किंवा 16 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सौदी अरेबियामध्ये झालेल्या मेगा लिलावानंतर हा एक छोटासा लिलाव आहे.
advertisement
रिटेन्शनची तारीख
10 संघांना खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे.चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ट्रेंड अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच घोषणा होण्याची अपेक्षा आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होणार आहे, तर राजस्थान रॉयल्स पुढील हंगामासाठी रवींद्र जडेजाला कायम ठेवेल.
वुमेन्स लीगचा लिलाव कधी?
महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव 27 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीत होईल. फ्रँचायझींनी आधीच त्यांच्या खेळाडूंना कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या लिलावासाठी संघांना अंतिम रूप देण्यासाठी सर्व तयारी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Auction : आयपीएल ऑक्शनचा वेन्यू ठरला,तिसऱ्यांदा भारताबाहेर होणार लिलाव? तारीखही आली समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement