Do You Know : टीम इंडियाने खेळल्या 2,718 मॅच, 693 जणांना संधी, पण 15 ऑगस्टला फक्त एकाच खेळाडूने गाजवलं मैदान!

Last Updated:

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रज यादिवशी देश सोडून गेले असले तरी ते भारताला क्रिकेट हा खेळ कायमचा देऊन गेले.

टीम इंडियाने खेळल्या 2,718 मॅच, 693 जणांना संधी, पण 15 ऑगस्टला फक्त एकाच खेळाडूने गाजवलं मैदान!
टीम इंडियाने खेळल्या 2,718 मॅच, 693 जणांना संधी, पण 15 ऑगस्टला फक्त एकाच खेळाडूने गाजवलं मैदान!
मुंबई : 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रज यादिवशी देश सोडून गेले असले तरी ते भारताला क्रिकेट हा खेळ कायमचा देऊन गेले. आजही क्रिकेटमुळे कोट्यवधी भारतीय जात, धर्म आणि पंथ विसरून एकत्र येतात. भारताने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 594 टेस्ट, 1066 वनडे आणि 1058 टी-20 अशा एकूण 2,718 मॅच खेळल्या आहेत. यात 318 खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटमध्ये, 256 जणांनी वनडेमध्ये आणि 119 जणांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात (एकूण 693 खेळाडू) भारताचं प्रतिनिधीत्व केलं, पण यातल्या फक्त एकाच खेळाडूला 15 ऑगस्टच्या दिवशी भारताकडून शतक झळकावता आलं आहे.
स्वातंत्र्य दिनी भारताकडून शतक झळकावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. 2019 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना विराट कोहलीने हा विक्रम केला होता, जो अजूनपर्यंत कुणालाच मोडता आलेला नाही. विराटने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सीरिजच्या शेवटच्या वनडेमध्ये शतक ठोकलं होतं. खरंतर ही मॅच 14 ऑगस्टला सुरू झाली, पण पावसामुळे 15 ऑगस्ट (भारतीय वेळेनुसार) ला या सामन्याचा निकाल लागला.
advertisement
पावसामुळे मॅचची दुसरी इनिंग रात्री 12 नंतर सुरू झाली त्यानंतर विराट कोहलीने खणखणीत शतक ठोकलं. विराटने 99 बॉलमध्ये नाबाद 114 रन केले, ज्यात 14 फोरचा समावेश होता. विराटने या इनिंगमध्ये 115.15 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. विराटच्या या शतकाच्या जोरावर भारताने 15 ऑगस्टच्या दिवशी दणदणीत विजय मिळवला.
पहिले बॅटिंग करणाऱ्या वेस्ट इंडिजने टॉस जिंकून 35 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 240 रन केले. यात क्रिस गेलने 41 बॉलमध्ये 72 रनची खेळी केली. तर खलील अहमदने भारतासाठी 3 विकेट मिळवल्या. पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला 35 ओव्हरमध्ये 255 रनचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 15 बॉल शिल्लक असताना 6 विकेट गमावून केला. कोहलीच्या शतकाशिवाय श्रेयस अय्यरने 65 रनची खेळी केली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Do You Know : टीम इंडियाने खेळल्या 2,718 मॅच, 693 जणांना संधी, पण 15 ऑगस्टला फक्त एकाच खेळाडूने गाजवलं मैदान!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement