Pahalgam Attack नंतर क्रिकेटर शोएब अख्तरवर मोठी कारवाई, भारत सरकारने दिला 'जोर का झटका'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shoaib Akhtar YouTube Channel Blocked : पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई करत आहे. आता सरकारने भारतात शोएब अख्तरवर कारवाई केली आहे.
Shoaib Akhtar YouTube Channel : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगाने पाकिस्तानच्या तोंडावर थू थू केलं. मात्र, तरीही पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही पाकिस्तानने आपली नापाक वृत्ती सोडलेली नाही. 27 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडा आणि पुंछ जिल्ह्यांतील नियंत्रण रेषेवर विनाकारण लहान शस्त्रांमधून गोळीबार केला. भारतीय जवानांनी जलदगतीने आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर देत हा प्रयत्न निष्फळ ठरवला आहे. अशातच आता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं असून काही मोठे निर्णय घेतले आहेत.
पाकिस्तानातील यूट्यूब चॅनेल्सवर बंदी
गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, भारत सरकारने जम्मू-कश्मीरमधील दुर्दैवी पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली आहे. भारत, त्याचे सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात भडकावू, सांप्रदायिक तणाव वाढवणारी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या पाकिस्तानातील काही यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईचा उद्देश देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या अपप्रचाराला आळा घालणे आहे. बंदी घालण्यात आलेल्या चॅनेलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचा देखील समावेश आहे.
advertisement
On the recommendations of the Ministry of Home Affairs, the Government of India has banned the 16 Pakistani YouTube channels including Dawn News, Samaa TV, Ary News, Geo News for disseminating provocative and communally sensitive content, false and misleading narratives and… pic.twitter.com/AusR1fCkvN
— ANI (@ANI) April 28, 2025
advertisement
शोएब अख्तरचा युट्यूब चॅनेल
दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. तसेच शोएब अख्तरचा युट्यूब चॅनेलचा देखील दिसेनासा झाला आहे. दिशाभूल करणारे कथन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
जम्मू विधानसभेचे विशेष अधिवेशन
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी जम्मू विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. हल्ल्यानंतर केंद्र सरकारने उचललेल्या पावलांच्या समर्थनार्थ एकमताने ठराव मंजूर केला जाऊ शकतो. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की हे अधिवेशन दहशतवादाविरुद्ध विशेष असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2025 11:14 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Pahalgam Attack नंतर क्रिकेटर शोएब अख्तरवर मोठी कारवाई, भारत सरकारने दिला 'जोर का झटका'