Rohit Sharma : जीवापेक्षा जड हिटमॅनने ऑटोग्रॉफ दिली, पोराला आभाळ ठेंगणं! ढसाढसा रडत सोडलं मैदान, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma fan Viral Video : रोहितने फॅन्सला देखील नाराज केलं नाही. रोहितने फॅन्सला ऑटोग्राफ दिल्या. त्यावेळी रोहित शर्माचा एक फॅन धाय मोकळून रडला.
Rohit Sharma fan broke into tears : रोहित शर्मा आता टीम इंडियाचा कर्णधार नाही. पण तरी देखील रोहित शर्माची फॅन फॉलोविंग काही कमी झाल्याचं पहायला मिळत नाही. कसोटी आणि टी-ट्वेंटीमधून निवृत्त झाल्यानंतर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवत होता. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तरुण शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा पुन्हा प्रॅक्टिस सेशनमध्ये दिसला.
लॅम्बोरगिनी पार्क झाली अन् चाहत्यांनी एकच गर्दी
मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहित शर्माची लॅम्बोरगिनी पार्क झाली अन् चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं पहायला मिळालं. रोहित शर्माने नेट्समध्ये सराव सुरू केला. प्रत्येक खेळाडूने रोहितला बॉलिंग करण्याची संधी सोडली नाही. रोहित शर्मा कसून घाम गाळला. त्यानंतर रोहितने फॅन्सला देखील नाराज केलं नाही. रोहितने फॅन्सला ऑटोग्राफ दिल्या. त्यावेळी रोहित शर्माचा एक फॅन धाय मोकळून रडला.
advertisement
बाहेर निघाला अन् डोळ्यात घळाघळा पाणी
रोहित शर्माचा भेटण्यासाठी एक लहान मुलगा धडपड करत होता. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला सोडलं नाही. त्यानंतर तो रडू लागल्यानंतर रोहितने त्याला बोलवून घेतलं. रोहितने ऑटोग्राफ दिली अन् पाठीवर थाप दिली. त्यानंतर रोहित शर्माच्या फॅन्सचे पाय थिरावले नाहीत. तो तातडीने बाहेर निघाला अन् डोळ्यात घळाघळा पाणी वाहिलं. रोहित शर्माकडे त्याने मागे वळून पाहिलं देखील नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
Rohit Sharma giving autograph to a little fan . The kid literally broke into tears after meeting him.
Moments like these show why Ro is loved so much.
pic.twitter.com/SPrN7F53GP
— Rohan (@rohann__45) October 11, 2025
दरम्यान, रोहित शिवाजी पार्कवर सराव करत असताना, एक चाहता त्याच्याकडे आला. हा चाहता एक लहान मुलगा होता. तो मुलगा रोहितजवळ येताच, सुरक्षारक्षक आणि काही उपस्थितांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रोहितला एका मुलाला थांबवल्याचे लक्षात आले तेव्हा त्याने त्याच्या सुरक्षारक्षकांवर ओरड केली. त्यानंतर हा मुलगा रोहितला भेटला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : जीवापेक्षा जड हिटमॅनने ऑटोग्रॉफ दिली, पोराला आभाळ ठेंगणं! ढसाढसा रडत सोडलं मैदान, पाहा Video