Rohit Sharma : रोहित घेणार अपमानाचा बदला! पुन्हा तेच करतोय जे 2011 च्या वर्ल्ड कपनंतर केलं, आता हिटमॅन 2.0

Last Updated:

Rohit Sharma loss 10 kg weight : रोहित शर्माने इतकी कठोर फिटनेस रूटीन शेवटची 2011 वर्ल्ड कपनंतर घेतली होती. जेव्हा तो संघातून वगळल्यानंतर पुन्हा प्रमुख टीममध्ये येण्याचा प्रयत्न करत होता.

Sanjay Bangar On Rohit Sharma loss 10 kg weight
Sanjay Bangar On Rohit Sharma loss 10 kg weight
Sanjay Bangar On Rohit Sharma : टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा आता फक्त वनडे संघात खेळताना दिसतोय. टेस्ट आणि टी-ट्वेंटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर हिटमॅन फक्त एकाच फॉरमॅटमधून खेळताना दिसेल. बीसीसीआयने रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून घेतल्यानंतर आता टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप जिंकवण्याचं स्वप्न अपूरं राहतंय की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. अशातच आता पुन्हा रोहित शर्मामधला हिटमॅन जागा झाला असून येत्या दोन वर्षात रोहितचं नवं रूप पहायला मिळू शकतं. माजी कोच संजय बांगर यांनी यावर मोठा खुलासा केला आहे.

रोहितच्या मनावर खोलवर परिणाम 

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांनी रोहित शर्माच्या सध्याच्या फिटनेस रूटीनबद्दल बोलताना 2011 च्या वर्ल्ड कप प्रसंगाची आठवण करून दिली. बांगर म्हणाले की, रोहित शर्माने इतकी कठोर फिटनेस रूटीन शेवटची 2011 वर्ल्ड कपनंतर घेतली होती. जेव्हा तो संघातून वगळल्यानंतर पुन्हा प्रमुख टीममध्ये येण्याचा प्रयत्न करत होता. संघात न घेतल्याच्या धक्क्याचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता आणि आता तीच जिद्द पुन्हा दिसत आहे, असं संजय बांगर यांनी म्हटलं आहे.
advertisement

मेहनत रोहितच्या विचारांमध्ये दिसते - संजय बांगर

2012 ते 2024 या काळात रोहितने प्रचंड यश मिळवले असलं तरी, फिटनेसवरून झालेल्या टीकेने त्याला निश्चितच विचार करण्यास लावलं आणि म्हणूनच त्याने आता सुधारणा करण्यासाठी मनापासून मेहनत घेतली आहे, हे त्यांच्या तयारी आणि विचारांमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचं बांगर यांनी नमूद केलं आहे.
advertisement

रोहित पुन्हा हंग्री आणि फिट दिसतोय

रोहित पुन्हा हंग्री आणि फिट दिसतोय, हे पाहून खूप आनंद होत आहे. एक कर्णधार म्हणून तुम्हाला कधीकधी बाउंड्रीवर फील्डिंग करावी लागते, डाइव्ह मारावी लागते आणि टीमसाठी टोन सेट करावा लागतो. रोहित स्वतःला त्याच आव्हानासाठी तयार करत आहे, जो एक अत्यंत सकारात्मक साईन असल्याचं देखील संजय बांगर यांनी म्हटलं आहे.
advertisement

ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वाचा

दरम्यान, रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वनडे सामने खेळणार आहे. युवा कॅप्टन शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळेल. पण यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. रोहित शर्मा वनडेमध्ये खेळणार असेल तर तो आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये देखील दिसू शकतो.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : रोहित घेणार अपमानाचा बदला! पुन्हा तेच करतोय जे 2011 च्या वर्ल्ड कपनंतर केलं, आता हिटमॅन 2.0
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement