Shubman Gill पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? दुखापतीवर मोठी अपडेट समोर! ड्रेसिंग रुममध्ये मोठ्या हालचाली

Last Updated:

Shubman Gill Injury Update : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी शनिवारी सराव करताना शुभमन गिलच्या हाताला दुखापत झाली. यादरम्यान, फिजिओ त्याच्याकडे धावले आणि त्याच्यावर उपचार केले.

Shubman Gill Injury Before India vs pakistan asia cup
Shubman Gill Injury Before India vs pakistan asia cup
Shubman Gill Injury Update : आशिया कप 2025 च्या गट टप्प्यातील सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल, इथंच टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर याच मैदानावर पाकिस्तानने देखील ओमानचा पराभव केला होता. अशातच आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

शुभमन फिजिओसह मैदानाबाहेर 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी शनिवारी सराव करताना शुभमन गिलच्या हाताला दुखापत झाली. यादरम्यान, फिजिओ त्याच्याकडे धावले आणि त्याच्यावर उपचार केले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गिलशी बोलताना दिसला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. टाईम्स ऑफ इंडिया (टीओआय) च्या वृत्तानुसार, गिल संघाच्या फिजिओसह मैदानाबाहेर जाताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गिल नेटमध्ये सराव करताना जखमी झाल्यानंतर वेदनेने वेदनेतून बाहेर पडताना दिसत आहे. चेंडू त्याच्यावर आदळताच फिजिओ बर्फाचा डबा घेऊन धावताना दिसला.
advertisement

गिल पुन्हा मैदानात

मिडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या अहवालानुसार, शुभमनला जास्त वेदना झाल्या नाहीत. सराव दरम्यान चेंडू त्याच्यावर हलका लागला ज्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. अहवालात असे सांगण्यात आलं आहे की दुखापतीनंतर काही मिनिटांनी गिलने पुन्हा सराव सुरू केला. मात्र, त्यानंतर देखील सर्वजण त्याच्यावर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे शुभमन पाकिस्तानविरुद्ध खेळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
advertisement

अभिषेक शर्मा तातडीने धावला

दरम्यान, शुभमनला दुखापत झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर गिलशी बोलताना दिसले. शुभमनचा सलामीचा साथीदार अभिषेक शर्मा त्याच्यासोबत राहिला. हाताला दुखापत झाल्यामुळे अभिषेकने शुभमनला पाण्याची बाटली उघडण्यास मदत केली. त्यामुळे शुभमनची दुखापत गंभीर देखील मानली जात आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही? दुखापतीवर मोठी अपडेट समोर! ड्रेसिंग रुममध्ये मोठ्या हालचाली
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement