Rohit Sharma चं माहित नाही पण विराटने निवृत्ती का घेतली? तालिबानी नेत्याने कुणावर फोडलं खापर? म्हणाला '50 वर्षापर्यंत...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Anas Haqqani on Virat Kohli : तालिबानचा मोठा नेता अनस हक्कानी यालाही कोहलीच्या निवृत्तीने धक्का बसला. कोहलीने काहीतरी समस्या असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांचे मत आहे.
Taliban Leader Anas Haqqani : टीम इंडियाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अचानक कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती (virat kohli retirement) जाहीर केल्याने जगभरातील त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले. विशेषतः विराट कोहलीच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला, ज्यात तालिबान नेतेही होते, असं पहायला मिळतंय. फक्त भारतातच नाही तर जगभरात विराट कोहलीची मोठी फॅन फॉलोविंग आहे.
कोहलीच्या निवृत्तीने धक्का
सामान्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच, तालिबानचा मोठा नेता अनस हक्कानी यालाही कोहलीच्या निवृत्तीने धक्का बसला. कोहलीने काहीतरी समस्या असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांचे मत आहे. या तालिबानी नेत्याने कोहलीने 50 व्या वर्षापर्यंत खेळत राहावे, असे म्हटले. कोहलीच्या जबरदस्त तंदुरुस्तीने हक्कानी खूप प्रभावित झाला आहे. त्यावेळी त्याने भारतीय माध्यमांवर देखील खापर फोडलं.
advertisement
विराटने निवृत्ती का घेतली? - हक्कानी
रोहितची निवृत्ती ठीक होती पण विराट कोहलीच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचं कारण मला माहित नाही. जगभरात खूप कमी लोक इतके खास आहेत. मला वाटते की त्याने 50 वर्षांपर्यंत खेळावे. कदाचित तो भारतीय माध्यमांवर चिडला असेल, असं असन हक्कानी म्हणाला. विराट कोहलीकडे अजूनही वेळ आहे. विराटने फक्त त्याचा फिटनेस सांभाळा. पण मला एकंदरीत वाटतं की, त्याने खुप लवकर निवृत्ती घेतली, असं अनस हक्कानी म्हणाला.
advertisement
Virat Kohli retired far too early, should have played till 50
Anas Haqqani@AnasHaqqani313 pic.twitter.com/MEhm63VP5o
— (@khan13ifad) September 13, 2025
विराट आणि रोहितमुळे स्टेडियम खाली
दरम्यान, विराट आणि रोहित शर्मा यांच्यामुळे आशिया कपमध्ये स्टेडियम खाली आहे, अशी चर्चा रंगली आहे. जेव्हा विराट कोहली रणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी गेला होता तेव्हा स्टेडियम जवळजवळ भरले होते. त्याची अनुपस्थिती हे तिकिटे लवकर विकली जात नसण्याचे एक प्रमुख कारण आहे, असं आकाश चोप्रा म्हणालाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 7:13 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma चं माहित नाही पण विराटने निवृत्ती का घेतली? तालिबानी नेत्याने कुणावर फोडलं खापर? म्हणाला '50 वर्षापर्यंत...'