IND W vs SL W : दीप्ती-अमनजोतने टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात वाचवलं, क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदाच घडला विक्रम
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 8 विकेट गमावून 269 रन केल्या आहेत.
गुवाहाटी : महिला वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 8 विकेट गमावून 269 रन केल्या आहेत. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताची अवस्था 124/6 अशी झाली होती. दीप्ती शर्माने अमनजोत कौर आणि स्नेह राणासोबत पार्टनरशीप करून भारताला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं.
दीप्ती शर्माने 53 बॉलमध्ये 53 तर अमनजोत कौरने 56 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली. स्नेह राणा 15 बॉलमध्ये 28 रनवर नाबाद राहिली. गुवाहाटीमध्ये पाऊस पडत असल्यामुळे हा सामना 47 ओव्हरचा खेळवला जात आहे. श्रीलंकेकडून इनोका रनवीराने 4 विकेट घेतल्या. तर उडेशिका प्रबोधिनीला 2 आणि आचिनी कुलासुरिया, चामिरी अटापटूला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांच्यामध्ये 103 रनची महत्त्वाची पार्टनरशीप झाली. भारतीय महिला टीमची क्रिकेट इतिहासाताली 7व्या किंव्या त्याखालच्या विकेटसाठीची ही दुसरी सर्वात मोठी पार्टनरशीप आहे. 2022 साली पाकिस्तानच्या महिला टीमविरुद्ध स्नेह राणा आणि पूजा वस्त्रकार यांच्यात 122 रनची पार्टनरशीप झाली होती.
या सामन्यात टीम इंडियाच्या चौथ्या ते सहाव्या विकेटच्या पार्टनरशीपने फक्त 4 रन केले. भारताच्या महिला टीमची वनडे क्रिकेटमधली ही दुसरी सर्वात वाईट कामगिरी आहे. याआधी 2002 साली न्यूझीलंडविरुद्ध भारतीय महिला टीमने चौथ्या ते सहाव्या विकेटसाठी फक्त 3 रन केल्या होत्या.
advertisement
श्रीलंकेच्या रनवीराने वयाच्या 39 वर्ष आणि 224 दिवसांची असताना महिला वनडे क्रिकेटमध्ये 4 विकेट घेतल्या. याआधी वेस्ट इंडिजच्या पमिला लविनने 41 वर्ष 39 दिवसांची असताना श्रीलंकेच्या महिला टीम विरुद्ध 17 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. सगळ्यात जास्त वय असताना वनडेमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम पमिलाच्या नावावर आहे. रनवीरा आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
Location :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
September 30, 2025 9:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND W vs SL W : दीप्ती-अमनजोतने टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात वाचवलं, क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदाच घडला विक्रम