IND vs WI : शुभमन गिलच खरा व्हिलन! यशस्वीची चूक नव्हतीच, रोहित शर्माचा 'तो' व्हिडीओ आला समोर

Last Updated:

Yashasvi Jaiswal Run Out Controversy : शुभमन गिलच्या एका चुकीमुळे यशस्वीचं द्विशतक हुकलं असं मानलं जातंय. अशातच रोहित अन् गिल यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय.

Yashasvi Jaiswal Run Out Controversy
Yashasvi Jaiswal Run Out Controversy
India vs West Indies 2nd Test : दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या युवा भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालकडून अपेक्षा खूप होत्या, पण जयस्वालने स्वतःच्या पायावर दगड मारला. यशस्वीने मिड ऑनच्या दिशेने बॉल मारला. त्यामुळे रन घेयचा की नाही, हे स्ट्राईकवर असलेल्या खेळाडूचा कॉल असतो. यशस्वीने पळ म्हणून घाई केली अन् शुभमनने धाव घेतली नाही. अशातच चूक कुणाची होती? असा सवाल विचारला जात असताना रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

शुभमन गिलच्या चुकीमुळे द्विशतक हुकलं?

यशस्वी जयस्वालचं द्विशतक हुकलं. यशस्वी जयस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला. यशस्वीच्या रुपात टीम इंडियाचा तिसरी विकेट गेली. यशस्वी 258 बॉलवर 22 फोरसह 175 धावा काढल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 318 धावांवर आपला डाव पुन्हा सुरू केला, परंतु संघाने लवकरच यशस्वीची विकेट गमावली. मात्र, शुभमन गिलच्या एका चुकीमुळे यशस्वीचं द्विशतक हुकलं असं मानलं जातंय. अशातच रोहित अन् गिल यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय.
advertisement

रोहित शर्माला रनआऊट, शुभमन पळाला नव्हता

सध्या सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचा मागील वनडे वर्ल्ड कपमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शुभमन गिल याने रोहित शर्माला रनआऊट केलं होतं. रोहितने पळ म्हणून कॉल दिला होता तरी देखील शुभमन पळाला नव्हता. तर आता देखील शुभमन गिल याने रन घेतला नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Ravi Kumar (@ziddi_ravi_76187)



advertisement

ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसला

दरम्यान, यशस्वी त्याच्या बाद झाल्यावर खूप निराश दिसत होता आणि काही काळ गिलवर रागही व्यक्त करत होता. शेवटी, तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसलेला दिसला. त्यामुळे आपलीच चूक होती, याची जाणीव त्याला झाली असावी.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : शुभमन गिलच खरा व्हिलन! यशस्वीची चूक नव्हतीच, रोहित शर्माचा 'तो' व्हिडीओ आला समोर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement