Yuzvendra Chahal : धनश्रीचा फसवणुकीचा आरोप, चहलने एका वाक्यात बोलती केली बंद, म्हणाला, 'मगं आमचं नातं इतकं वर्ष...'

Last Updated:

लग्नानंतर दोनच महिन्यात युझवेंद्र चहलला रंगेहात पकडल्याचा आरोप केला होता. एकंदरीत तिचा नात्यात फसवणूक झाल्याचा आरोप होता.या आरोपांवर आता पहिल्यांदाच टीम इंडियाचा क्रिकेटवर युझवेंद्र चहलने प्रतिक्रिया दिली आहे.

yuzvendra chahal reply dhanashree verma
yuzvendra chahal reply dhanashree verma
Yuzvendra Chahal Reply Dhanashree Verma on cheating : डान्सर आणि कोरीओग्राफर धनश्री वर्मा संध्या राईस अँड फॉल या रिअॅलीटी शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमधून ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करते आहे. नुकताच तिने लग्नानंतर दोनच महिन्यात युझवेंद्र चहलला रंगेहात पकडल्याचा आरोप केला होता. एकंदरीत तिचा नात्यात फसवणूक झाल्याचा आरोप होता.या आरोपांवर आता पहिल्यांदाच टीम इंडियाचा क्रिकेटवर युझवेंद्र चहलने प्रतिक्रिया दिली आहे. जर मी लग्नानंतर 2 महिन्यात तिची फसवणूक केली असती, तर आमचं नातं इतकं वर्ष टीकलं नसतं, असं उत्तर त्याने दिले आहे.
युझवेंद्र चहलने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना धनश्री वर्माच्या आरोपावर उत्तर दिले आहे.मी एक खेळाडू आहे, त्यामुळे मी तिची अजिबात फसवणूक केली नाही असे युझवेंद्र चहलने सांगितले आहे. जर कुणी लग्नाच्या 2 महिन्यातच फसवणूक केली असती तर इतकी वर्ष नातं टीकलं असतं का? असा सवाल देखील चहलने उपस्थित केली आहे.
युझवेंद्र चहल पुढे म्हणाला ती, माझ्या आयुष्यातून हा विषय आता संपला आहे. आणि तो धुळीत टाकला आहे.आणि मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही पुढे जावे, असा सल्ला त्याने नाव न घेता धनश्री वर्माला दिला.
advertisement
आमचं लग्न फक्त 4.5 वर्षचं होतं. आणि जर लग्नाच्या 2 महिन्यातच मी तिटची फसवणूक केली असती तर इतकं वर्ष नातं टिकलंच नसतं? मी आधी देखील बोललो आहे, मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडलो आहे. पण काही लोकं अजुनही त्याच गोष्टींना पकडून आहेत.कारण अजूनही माझ्या नावाने तिचं (धनश्री वर्मा) घरं चालतंय, असा टोला देखील युझवेंद्र चहलने लगावला आहे.
advertisement
चहल पुढे म्हणाला, ते अजूनही तेच करत राहणार आहे. पण मला त्याची काळजी नाही आणि मला त्याचा त्रासही होत नाही.आणि मला असे वाटते माझ्या आयुष्यातील त्या प्रकरणावर मी आता शेवटचा संवाद साधतोय,असे देखील चहल म्हणाला.
मी माझ्या आयुष्यातला तो भाग विसरलो आहे.कारण कुणीही काहीही बोलतं आणि सोशल मीडियावर ते चालून जातं. 100 गोष्टी चालतात.पण सत्य फक्त तेच आहे, आणि ते त्यांना माहिती आहे. मला आता यावर अजिबात बोलायचं नाही आहे.मी माझ्या आयुष्यावर आणि खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे,असे शेवटी चहलने सांगितले.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Yuzvendra Chahal : धनश्रीचा फसवणुकीचा आरोप, चहलने एका वाक्यात बोलती केली बंद, म्हणाला, 'मगं आमचं नातं इतकं वर्ष...'
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement