WhatsApp यूझर्सची मज्जा! आता नंबर सेव्ह न करता करु शकाल कॉल

Last Updated:

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲपने कॉलिंगसाठी एक नवीन फीचर आणले आहे. आता तुमची WhatsApp कॉलिंगची स्टाइल बदलणार आहे. हे फीचर आणल्यानंतर व्हॉट्सॲप कॉलिंगसाठी कॉन्टॅक्ट सेव्ह करण्याचा त्रास संपला आहे.

व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप
नवी दिल्ली : WhatsApp एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. कौटुंबिक असो वा ऑफिसचं काम, हे कॉन्टॅक्टचं महत्त्वाचं साधन बनलंय. यूझर्सचा अनुभव सुधारण्यासाठी, WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर जोडत आहे. या सीरीजमध्ये कंपनीने आता आयफोन यूझर्ससाठी नवीन 'कॉल डायलर' फीचर आणले आहे. आता व्हॉट्सॲपवर कॉल करण्यासाठी कुणाचा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. या फीचरद्वारे तुम्ही आता कोणालाही त्यांचा नंबर डायल करून सहज कॉल करू शकता.
तुम्हालाही ‘कॉल डायलर’ फीचरचा लाभ घ्यायचा असेल, तर व्हॉट्सॲपला लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा. WABetaInfo या व्हॉट्सॲप फीचरला ट्रॅक करणाऱ्या वेबसाइटने या फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या iOS 25.1.80 अपडेटसाठी WhatsApp बीटामधील सर्व iOS यूझर्ससाठी हे फीचर आणले जात आहे. डायलरमध्ये फोन नंबर मॅन्युअली टाकण्याची सुविधा कॉल्स टॅब अंतर्गत उपलब्ध झाली आहे.
advertisement
advertisement
WhatsApp चे कॉल डायलर फीचर कसे वापरावे
सर्व प्रथम WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर जा. येथे क्रिएट कॉल किंवा प्लस आयकॉनवर टॅप केल्यानंतर ‘कॉल अ नंबर’चा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करताच व्हॉट्सॲपमध्ये फोन डायलर उघडेल. आता तुम्हाला ज्याला कॉल करायचा आहे त्याचा नंबर डायल करा. नंबर डायल केल्यानंतर, एंटर केलेला नंबर व्हॉट्सॲपवर रजिस्टर्ड आहे की नाही हे WhatsApp तपासेल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp यूझर्सची मज्जा! आता नंबर सेव्ह न करता करु शकाल कॉल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement