पल्सर गाडीच्या इंजिनपासून तयार केली गो कार्ट, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी मिळवली 8 बक्षिसे
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी पल्सर गाडीच्या इंजिनपासून रेसिंग कार्ट तयार केली. सोबतच इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट सुद्धा केली. नुकत्याच कोइंबतूर येथे झालेल्या गो कार्ट स्पर्धेत त्यांना 8 बक्षिसे मिळाली आहेत.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अमरावती येथील युथ वेल्फेअर सोसायटीच्या प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड रिसर्च, बडनेरा येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष मा डॉ. नितीन धांडे आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून या कॉलेजमध्ये अनेक नवीन उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणुन येथील मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी पल्सर गाडीच्या इंजिनपासून रेसिंग कार्ट तयार केली. सोबतच इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट सुद्धा केली. नुकत्याच कोइंबतूर येथे झालेल्या गो कार्ट स्पर्धेत त्यांना 8 बक्षिसे मिळाली आहेत.
advertisement
युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या मुलांनी उत्तम कामगिरी केली आहे. आमचे कॉलेज त्यांना नेहमी सपोर्ट करते. पुढेही त्यांना आमचा असच सपोर्ट राहील. विद्यार्थ्यांना या कामासाठी लागणारी रक्कम आम्ही राखीव ठेवलेली आहे. त्याचबरोबर कोषाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख म्हणाले की, आमचे विद्यार्थी नेहमीं नवीन काही तरी करतात. त्यांना कॉलेज कडून भरपूर सपोर्ट आहे.
advertisement
विभागप्रमुख प्रा. डॉ. अनुप शिरभाते यांनी सांगितले की, या दोन्ही कार्ट आमच्या कॉलेजमध्येच तयार झाल्यात. त्याला जवळपास 2 लाख रुपये खर्च आला आहे. हा खर्च संस्थेचे अध्यक्ष आणि बाकी सहकाऱ्यांनी दिला आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी प्रा. अभिजीत ठाकरे आणि प्रा. प्रियंका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन महिने गाडी बनविण्यासाठी परिश्रम घेतले. विविध स्तरांवर पडताळणी झाल्यावर त्याचे सादरीकरण कोइम्बतूर येथे करण्यात आले. कोइम्बतूर येथील अकॅडमी ऑफ इंडिजीनेईस मोटर स्पोर्टद्वारा (AIMS) कार्ट रेसिंग नॅशनल चॅम्पियनशिपचे आयोजन 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत करण्यात आले होते.
advertisement
यामध्ये देशभरातील सुमारे विविध राज्यांतील 47 चमूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये 150 सीसी गाडीच्या श्रेणीमध्ये आणि इलेक्ट्रिक कार्टच्या श्रेणीमध्ये अमरावतीच्या मेघे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत 8 बक्षिसे पटकाविले.
1. 150 CC CV कार्ट श्रेणीमध्ये ऑल इंडिया रँक 2 (उपविजेता).
2. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
3. एन्ड्युरन्स अंडर cv 150 cc कार्ट श्रेणीमध्ये पहिले स्थान
advertisement
4. CV 150 cc कार्ट श्रेणी अंतर्गत ऑटोक्रॉस इव्हेंटमध्ये विजेता
(पहिला).
5. CV कार्ट श्रेणी अंतर्गत मुलींच्या विशेष सहनशक्तीमध्ये प्रथम पारितोषिक (प्रथम).
6. 5 किलोवॅट ते 6 किलोवॅट EV कार्ट श्रेणीतील ऑटोक्रॉस
इव्हेंटमधील विजेता
7. ईकार्ट श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट सांघिक भावना पुरस्कार विजेते
8. CV कार्ट श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट नवोपक्रम पुरस्कार विजेते
advertisement
ही सर्व माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा याबाबत माहिती दिली. त्यांना यात कोणकोणत्या अडचणी आल्यात तेही सांगितले.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
October 25, 2024 4:53 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
पल्सर गाडीच्या इंजिनपासून तयार केली गो कार्ट, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी मिळवली 8 बक्षिसे

