सायबर फ्रॉडपासून बचावासाठी TRAI चा नवा अलर्ट! जाणून घ्या, अन्यथा...
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतात सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर ठग सतत नवनवीन ट्रिक शोधून लोकांना लक्ष्य करत असतात. जानेवारी ते जून या कालावधीत सायबर फसवणूक करून 11,269 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारे दररोज सुमारे 60 कोटी रुपयांची फसवणूक केली जात आहे.
मुंबई : भारतात सायबर गुन्ह्यांच्या घटना कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे घोटाळेबाज लोकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन ट्रिक शोधत असतात. त्यामुळेच डिजिटल अटकेसारख्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. एका फोन कॉलने किंवा एसएमएसने, लोकांची बँक खाती काही मिनिटांत रिकामी केली जातात. हे स्कॅमर लोकांची पर्सनल माहिती कॉल किंवा मेसेजद्वारे चोरून फसवणूक करण्याचे गुन्हे करतात.
फसवणुकीच्या अशा घटना रोखण्यासाठी सरकारही अनेक पावले उचलत आहे. कॉल्सद्वारे फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर,टेलीकॉम रेग्यूलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने लोकांना सावधगिरीचा इशारा जारी केला आहे. ट्रायने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे आणि लोकांना नवीन कॉल स्पॅमबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये लोकांना मोबाईल नेटवर्क बंद करण्यास सांगितले जात आहे.
advertisement
TRAIने म्हटले आहे की, घोटाळेबाज त्यांचे नेटवर्क बंद करण्याची धमकी देऊन लोकांकडून पैशांची मागणी करत आहेत. यूझर्सला कॉल करून, ते नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांचे नेटवर्क बंद करण्याची धमकी देतात आणि त्यांना मोठी रक्कम देण्यास सांगतात. पण ट्रायकडून असे कोणतेही कॉल केले जात नाहीत. लोकांना असा कोणताही फोन आल्यास त्यांनी त्वरित संचार साथी पोर्टलवर तक्रार करावी.
advertisement
भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने होणारी वाढ चिंताजनक आहे. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल म्हणजेच NCRP नुसार, 2024 च्या पहिल्या तिमाहीत सायबर गुन्ह्यांच्या सुमारे 7.4 लाख तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जानेवारी ते जून या कालावधीत सायबर फसवणूक करून 11,269 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. अशा प्रकारे दररोज सुमारे 60 कोटी रुपयांची फसवणूक केली जात आहे. सायबर फसवणुकीमुळे जीडीपीच्या 0.7 टक्के इतके नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या मते, पुढील वर्षी सायबर फसवणुकीत भारतीयांना 1.2 लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. ही फसवणूक मुख्यतः चीनमधून होते आणि फसवणूक करून वसूल केलेली रक्कम देशाबाहेर नेली जाते. बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या MULE बँक खात्यांचा येत्या वर्षभरात ऑनलाइन आर्थिक घोटाळ्यांमध्ये वाढ होण्यास सर्वात मोठा हातभार लागणार आहे. याबाबत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2024 10:31 AM IST