आवाजही येत नाही, उंचीवरही सहज चढते, भारतीय सैन्यदलात दाखल होणार स्पेशल वाहने

Last Updated:

special vehicles in army - विशेष म्हणजे शत्रूच्या परिसरातही हे वाहन सहज जाऊ शकते. यामध्ये एका वाहनात चालकासह 8 लोक सहज बसू शकतात. त्यात शस्त्रे आणि इतर साहित्यही पाठवता येते. हे वाहन उच्च उंचीच्या भागातसुद्धा अगदी सहज चढू शकते. या वाहनाचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे.

सैन्यदलासाठी तयार करण्यात आलेली इलेक्ट्रिक कार
सैन्यदलासाठी तयार करण्यात आलेली इलेक्ट्रिक कार
शाश्वत सिंह, प्रतिनिधी
झाशी : भारतीय सैन्यदल हे जगातील एक शक्तिशाली सैन्यदल आहे. ही आपली भारतीय सेना आता देशाच्या रक्षणासोबत पर्यावरणाचेही रक्षण करत आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय सैन्यदल आता पेट्रोल-डिझेल वाहनांसह बॅटरीवर चालणारी वाहने वापरणार आहे. भारतीय सैन्यदलाच्या वतीने पेट्रोलिंगसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणार आहे. लेह आणि इतर डोंगराळ भागात या वाहनांची चाचणी घेतली जात आहे.
advertisement
ही वाहने तयार करणाऱ्या टीमचे सदस्य मोहित यादव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हे वाहन 600 किलोपर्यंत वजन वाहू शकते. तसेच हे वाहन केवळ सैन्यदलाच्या वापरासाठी बनवण्यात आले आहेत. कोणताही आवाज न करता हे वाहन गस्त घालू शकते.
advertisement
विशेष म्हणजे शत्रूच्या परिसरातही हे वाहन सहज जाऊ शकते. यामध्ये एका वाहनात चालकासह 8 लोक सहज बसू शकतात. त्यात शस्त्रे आणि इतर साहित्यही पाठवता येते. हे वाहन उच्च उंचीच्या भागातसुद्धा अगदी सहज चढू शकते. या वाहनाचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे.
या वाहनासोबतच भारतीय सैन्यदलासाठी इलेक्ट्रिक दुचाकीही तयार करण्यात आली आहे. बॅटरीवर चालणारी ही दुचाकी ऑफ-रोडिंगसाठी बनवण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही बाईक तब्बल 300 किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते. ताशी 100 किलोमीटर वेगाने धावण्यास ही दुचाकी सक्षम आहे. अशाप्रकारे या वाहनांच्या मदतीने भारतीय लष्कराचा पेट्रोल आणि डिझेलवरील खर्च कमी होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
आवाजही येत नाही, उंचीवरही सहज चढते, भारतीय सैन्यदलात दाखल होणार स्पेशल वाहने
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement