WhatsApp वर येतंय भारी फीचर! रिप्लाय देणं होईल आणखी सोपं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Tech Tips: व्हॉट्सॲपने आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम फीचर्स आणले आहेत. व्हॉट्सॲप अपडेट केल्यानंतर तुम्ही या फीचर्सचा वापर करू शकाल. अपडेट केल्यानंतर, तुम्ही मेसेजवर अधिक सहजपणे रिअॅक्शन देऊ शकता किंवा रिप्लाय देऊ शकता.
WhatsApp Update: व्हॉट्सॲप आपल्या यूझर्ससाठी नवनवीन अपडेट आणत आहे. अलीकडेच कंपनीने आपल्या यूझर्सना 3 शानदार फीचर्स भेट दिली आहेत. या तीन फीचर्सविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
सेल्फी स्टिकर्स
नावाप्रमाणेच, आता तुम्ही सेल्फी स्टिकर्स पाठवून तुमच्या चॅटला अधिक मजेदार बनवू शकता. WhatsApp वर सेल्फी स्टिकर पाठवण्यासाठी, प्रथम स्टिकर चिन्हाला स्पर्श करा. यानंतर तुम्ही सेल्फी घेऊन स्टिकर तयार करू शकता. मात्र, सध्या हे फीचर फक्त अँड्रॉइड युजर्ससाठी आणले गेले आहे. आयओएस यूझर्सना हे फीचर वापरण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
advertisement
डबल टॅप करून लगेच मेसेजवर उत्तर द्या, वेळही वाचेल
आता तुम्ही चॅटवर कोणत्याही मेसेजला सहज उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त दोनदा टॅप करावे लागेल. तुम्ही दोनदा टॅप करताच, तुम्ही सहज रिप्लाय देऊ शकाल. याआधी कोणत्याही मेसेजला रिप्लाय देण्यासाठी म्हणजेच रिअॅक्शन इमोजीवर क्लिक करण्यासाठी जास्त वेळ दाबावे लागत होते.
advertisement
तुम्हाला कॅमेरा इफेक्ट्सचा शानदर अनुभव मिळेल
आता तुम्ही व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंगदरम्यान 30 पेक्षा जास्त बॅकग्राउंड, फिल्टर आणि इफेक्ट्स वापरु शकाल. यामुळे तुमचा व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव आणखी चांगला होईल.
WhatsApp वर चॅट लॉक फीचर कसे वापरावे
चॅट लॉक आणि ॲप लॉकची सुविधा व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे. खरंतर, यापूर्वी काही यूझर्स व्हॉट्सॲप लॉक करण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्स वापरत होते. जर तुमचे व्हॉट्सॲप देखील अपडेट असेल तर तुम्ही केवळ चॅटच नाही तर ॲपही लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
advertisement
व्हॉट्सॲप उघडा आणि सर्वात आधी सेटिंगमध्ये जा. Privacy वर गेल्यावर तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. यातील पहिला ॲप लॉक आणि दुसरा चॅट लॉक आहे. WhatsApp लॉक इनेबल करून, तुम्ही तुमचे WhatsApp ॲप लॉक करू शकता. अशा परिस्थितीत, जर कोणी तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप तपासण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी पासवर्ड टाकणे आवश्यक असेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 4:45 PM IST