WhatsApp हॅक झालंय हे कसं कळतं? या गोष्टी पाहून व्हा सावधान, असा करा बचाव
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp चा वापर आता आवश्यक झाला आहे. यावर अनेक सेन्सिटिव्ह इंफॉर्मेशन सेव्ह होते. ज्यामुळे हॅकर्सही यावर नजर ठेवतात. यामुळे हॅकिंगपासून बचाव करणे गरजेचे आहे.
मुंबई : WhatsApp चे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. हे लोक मेसेज आणि कॉलिंगपासून फाइल शेयरिंगपर्यंत याचा वापर करतात. याच कारणामुळे यावर खुप जास्त पर्सनल इंफॉर्मेशन ट्रान्सफर होते. म्हणूनच हॅकर्सही यावर नजर ठेवून असतता. कंपनी या प्लॅटफॉर्मवर अनेक सेफ्टी फीचर्स देतात. मात्र अनेकदा हॅकर्स हे हॅक करण्यात यशस्वी होतात. यामुळे तुमचा डेटा मिसयूज होऊ शकतो. यामुळे हॅकिंगपासून बचाव करणे गरेजेच आहे. आज आपण पाहूया की, व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे हे कसं कळेल आणि असं झाल्यास तुम्ही काय करायला हवं.
'हे' आहेत अकाउंट हॅक होण्याचे संकेत
ऑटोमॅटिक लॉग-आउट होणे : तुमचा व्हॉट्सअॅप विना कारण लॉग-आउट झाला तर 'योर फोन नंबर इज नो लॉन्गर रजिस्टर्ड' असा मेसेज आला तर समजून जा की व्हॉट्सअॅप हॅक झाला आहे.
तुमच्या चॅट दरम्यान अज्ञात मेसेज दिसतात - तुम्हाला अज्ञात लोकांना पाठवलेले मेसेज किंवा तुम्ही न पाठवलेले मेसेज दिसले तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. हे शक्य आहे की कोणीतरी तुमचे खाते अॅक्सेस केले असेल आणि तुमच्याशी चॅट करत असेल.
advertisement
लिंक्ड डिव्हाइसेस अंतर्गत अज्ञात डिव्हाइसेस दिसले तर - WhatsApp सेटिंग्जमध्ये जा आणि लिंक्ड डिव्हाइसेसवर टॅप करा. तुम्हाला येथे कोणतेही अज्ञात किंवा संशयास्पद डिव्हाइस दिसले तर, तुमचं अकाउंट दुसरं कोणी तरी वापरत असू शकतो.
अज्ञात किंवा नवीन ग्रुप्समध्ये जोडले जाणे - तुम्हाला अचानक पूर्णपणे अज्ञात किंवा संशयास्पद ग्रुप्समध्ये जोडले गेले तर सावध रहा. असे असू शकते की कोणीतरी तुमचे अकाउंट वापरत असेल.
advertisement
हॅकिंगपासून बचावासाठी काय करावं?
- अकाउंट सेफ्टीसाठी नेहमी टू-फॅफ्कटर ऑथेंटिकेशनचा वापर करा. यामुळे पासवर्ड लीक होऊनही तुमचं अकाउंट सेफ राहतं.
- तुम्हाला अकाउंटशी संबंधित एखादी संशयित अॅक्टिव्हिटी दिसली तर सर्व डिव्हाइसमधून लगेच लॉग-आउट करा.
- हॅकिंगपासून बचावासाठी नेहमी व्हॉट्सअॅप आणि फोनच्या सॉफ्टवेयरला अपडेट ठेवा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 2:17 PM IST










