Whatsapp आणतंय नवं प्रायव्हसी फीचर, आता कोणाला दिसणार नाही तुमचा नंबर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
व्हॉट्सॲप हे देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे व्यासपीठ आहे. बहुतेक लोक मेसेज, फोटो, व्हिडिओ किंवा डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी किंवा रिसिव्ह करण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्म वापरतात.
मुंबई : Whatsapp New Feature: व्हॉट्सअॅप हे देशात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. बहुतेक लोक मेसेज, फोटो, व्हिडिओ किंवा कागदपत्रे पाठवण्यासाठी किंवा रिसिव्ह करण्यासाठी WhatsApp प्लॅटफॉर्म वापरतात. व्हॉट्सॲपवर बोलत असताना दोघांना एकमेकांचे नंबर दाखवले जातात. पण आता असे होणार नाही, खरे तर व्हॉट्सॲप लवकरच एक नवीन प्रायव्हसी फीचर लाँच करणार आहे ज्यानंतर कोणालाही तुमचा नंबर कळू शकणार नाही. चला याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
कसं काम करेल नवं फीचर?
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, हे यूजरनेम प्रायव्हसी फीचर व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड आणि iOS बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. हे नवीन फीचर इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या युजरनेम फीचरच्या धर्तीवर काम करत आहे. या फीचरमध्ये यूजर्सना मोबाईल नंबर दिसत नाही. अशा परिस्थितीत लोक व्हॉट्सॲप यूजर्सना त्यांच्या यूजरनेमद्वारे सर्च करू शकतील. जगभरात वाढत असलेल्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
मोबाईल नंबरशिवाय चॅटिंग होईल
पूर्वी बरेच लोक व्हॉट्सॲपवर ग्रुप्समध्ये जोडलेले असायचे. ग्रुपमधील लोक एकमेकांचे नंबर सहज पाहू शकत होते. पण आता हे नवीन प्रायव्हसी फीचर आल्यानंतर तुम्हाला ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचा फोन नंबर कळू शकणार नाही. नंबर ऐवजी, तुम्हाला आता त्याचं युझरनेम दिसेल.
advertisement
यूझरनेमने होईल ओळख
हे नवीन फीचर आल्यानंतर मोबाईल नंबरऐवजी आता फक्त युझरनेम लोकांची ओळख सांगेल. चॅटिंगसोबतच व्हॉट्सॲप युजर्सना UPI सर्व्हिस देखील देते. अशा स्थितीत जर कोणी अनोळखी व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर कळाला तर तो तुम्हाला कॉल करुन त्रास देऊ शकतो. त्यामुळेच आता हे नवीन प्रायव्हसी फीचर आणल्यानंतर लोकांचे मोबाईल नंबर सुरक्षित होणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 29, 2025 2:30 PM IST