या वर्षात 4 भयानक घटना घडणार! 17 फेब्रुवारीलाच पहिलं संकट धडकणार; टाईम ट्रॅव्हलरचा खळबळजनक दावा
- Published by:Priya Lad
Last Updated:
2024 Predictions : स्वत:ला टाईम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या या व्यक्तीने आपण 647 वर्षे पुढचं जग पाहिल्याचा दावा केला आहे. या वर्षात कोणती संकटं येणार हे त्यानं सांगितलं आहे.
नवी दिल्ली : संकटं सांगून येत नाहीत. पण असे काही भविष्य सांगणारे लोक आहेत जे संकटांबाबत भविष्यवाणी करतात. अशाच एका व्यक्तीने 2024 सालात येणाऱ्या संकटांबाबत सांगितलं आहे. या वर्षात एक-दोन नाही तर तब्बल 3 संकटं आहेत. त्यापैकी एक संकट 17 फेब्रुवारीलाच धडकणार आहे. स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या व्यक्तीने हा दावा केला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सामान्यपणे ग्रह-तारे, चेहरा, हात हे पाहून भविष्य सांगितलं जातं. पण काही लोक असे आहेत जे आपण स्वतः भविष्यात जाऊन आल्याचा दावा करतात. ते स्वतःला टाइम ट्रॅव्हरल म्हणवतात. असाच एक टाइम ट्रॅव्हरल ज्याचं नाव इनो अलारिक असं आहे. @theradianttimetraveller या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे.ज्यात त्याने आपण 647 वर्षे पुढचं जग पाहिल्याचा दावा केला आहे. या वर्षात कोणती संकटं येणार हे त्यानं सांगितलं आहे. त्याने तारीख सांगत त्या दिवशी काय घडणार हे सांगितलं आहे.
advertisement
त्याने दिलेल्या धोक्याच्या तारखांमध्ये 17 फेब्रुवारी, 28 मार्च, 2 एप्रिल, 15 मे यांचा समावेश आहे. या दिवसांबाबत त्यानं नेमकी काय भाकीतं वर्तवली आहेत ती पाहुयात. 17 फेब्रुवारी - अमेरिकेतील टेक्सासमधील ह्यूस्टनला एक भयानक वादळ धडकेल, ज्यामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त होईल. इतिहासातील हे सर्वात विनाशकारी वादळ असेल.
advertisement
28 मार्च - एक प्राचीन वस्तू सापडेल, ज्याला स्पर्श केल्यावर व्यक्ती दुसऱ्या जगात जाईल. त्याला 'पँडोरा बॉक्स' म्हटलं जाईल.
2 एप्रिल - या दिवशी बिग जॉन नावाचा एक भयानक भूकंप होईल, ज्याची तीव्रता 9.8 तीव्रता असेल. यानंतर कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर 750 फूट उंचीची त्सुनामी येईल, ज्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोसारख्या मोठ्या शहरांचा नाश होईल.
advertisement
15 मे - या दिवशी एक एलियन पृथ्वीवर येईल, ज्याला चॅम्पियन म्हटलं जाईल. तो दुसऱ्या ग्रहावर स्थायिक होण्यासाठी 1 लाख लोकांना सोबत घेऊन जाईल.
व्यक्तीच्या पोस्टवर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेक लोकांनी त्याला त्याचे किती दावे खरे ठरले, अशी विचारणा केली आहे. अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. दरम्यान याआधीसुद्धा अशा काही टाइम ट्रॅव्हरलनी भविष्याबबात दावे केले आहेत. ते खरे ठरल्याचे पुरावे नाहीत. न्यूज18मराठीसुद्धा या दाव्यांचं समर्थन करत नाही.
Location :
Delhi
First Published :
February 15, 2024 7:52 AM IST
मराठी बातम्या/Viral/
या वर्षात 4 भयानक घटना घडणार! 17 फेब्रुवारीलाच पहिलं संकट धडकणार; टाईम ट्रॅव्हलरचा खळबळजनक दावा