दक्षिण भारतातील मंदिरांजवळ मांसाहारी हॉटेल्स का असतात? भारतातील इतर भागांप्रमाणे तिथे विरोध केला जात नाही का?

Last Updated:

दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरांजवळ मांसाहारी हॉटेल्स सहज उपलब्ध असतात आणि यावर कोणीही आक्षेप घेत नाही. तर उत्तर भारतातील मंदिरांच्या आसपास मांस विकलं जात नाही आणि ते हॉटेलमध्ये देखील विकलं जात नाही. असं का?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळे धर्म, भाषा, खानपान आणि जीवनशैलीतील फरक असलेले लोक ठळकपणे दिसतील. ज्यामुळे तुम्ही भारताच्या कोणत्याही टोकाला जा तुम्हाला प्रत्येक ठिकण वेगळं भासेल आणि तेथील चालीरिती देखील वेगळं असल्याचं तुम्हाला जाणवेल.
विशेषतः धार्मिक स्थळांच्या बाबतीत तुम्हाला एक मोठा फरक नक्कीच जाणवेल, खासकरुन उत्तर भारत आणि दक्षिण भारतात खूप मोठा फरक आहे. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरांजवळ मांसाहारी हॉटेल्स सहज उपलब्ध असतात आणि यावर कोणीही आक्षेप घेत नाही. तर उत्तर भारतातील मंदिरांच्या आसपास मांस विकलं जात नाही आणि ते हॉटेलमध्ये देखील विकलं जात नाही. असं का? खरंतर यामागे खोल सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत.
advertisement
दक्षिण भारतातील काही प्रसिद्ध मंदिरांजवळ नॉनवेज रेस्टॉरंट्स
रामेश्वरम (तमिळनाडू) – येथे मच्छीमारांचे वर्चस्व आहे. समुद्रकिनारी असलेल्या या तीर्थक्षेत्रात सीफूड रेस्टॉरंट्स सहज मिळतात.
मीनाक्षी मंदिर, मदुरै छ मंदिराजवळच अनेक मटन बिर्याणी शॉप्स, हॉटेल्स आहेत.
चिदंबरम नटराज मंदिर : इथे शाकाहारी आणि नॉनवेज हॉटेल्स दोन्ही सामान्य आहेत.
अरुणाचलेश्वर मंदिर, तिरुवन्नामलै : प्राचीन शिव मंदिर असून परिसरात नॉनवेज रेस्टॉरंट्स सामान्य आहेत.
advertisement
श्रीशैलम, आंध्र प्रदेश : येथे ज्योतिर्लिंग असून बाहेरच्या बाजारात चिकन, अंडी, मटनसारखे पर्याय खुलेआम उपलब्ध आहेत.
दक्षिण भारतात भक्ती आणि अध्यात्म यांचा मोठा प्रभाव आहे, पण त्याचवेळी अन्न हा वैयक्तिक पसंतीचा किंवा उपजीविकेचा भाग मानला जातो. मंदिरातील पवित्रता पाळली जाते, मात्र मंदिराबाहेर कोण काय खातंय, यावर समाज सामूहिक बंधन घालण्याचा प्रयत्न करत नाही.
advertisement
नायर, रेड्डी, वोक्कालिगा, थेवर, गौंडर अशा अनेक समुदायांसह काही ब्राह्मण जातीदेखील (केरळ, बंगाल) मांस आणि मासे खातात. त्यामुळे मांसाहार हा धार्मिक अपवित्रता नसून, जीवनशैलीचा भाग मानला जातो.
मंदिर व्यवस्थापनाचा प्रकारही कारणीभूत
उत्तर भारतात अनेक मंदिरांवर राजकीय किंवा सामाजिक संघटनांचा प्रभाव असतो. दक्षिण भारतात मंदिरांचे नियंत्रण देवस्थान बोर्ड किंवा मठांकडे असते. हे संस्था स्थानिक विविधतेनुसार काम करतात आणि अन्नावर कट्टर नियंत्रण टाकत नाहीत.
advertisement
दक्षिण भारतात द्रविड चळवळ, आंबेडकरी विचार आणि प्रादेशिक पक्षांमुळे धार्मिक राजकारण तुलनेत कमी आहे. त्यामुळे सह-अस्तित्वाचा दृष्टिकोन अधिक आहे.
आता रामेश्वर सारख्या ठिकाणाबद्दल बोलायचं झालं तर रामेश्वरमसारख्या तटीय तीर्थस्थळी मासेमारी ही स्थानिकांची मुख्य उपजीविका आहे. त्यामुळे या परिसरात मासे विकणे आणि खाणे हे सामान्य आहे आणि ते तेथील लोकांचा आहाराचा भाग असणं देखील कॉमन आहे, त्यामुळे हे हटवणे व्यावहारिकही नाही आणि नैतिकदृष्ट्याही अयोग्य समजले जाते.
advertisement
दक्षिण भारतातील चोल, पांड्यांसारखे राजे स्वतः मांसाहारी होते. त्यामुळे दक्षिण भारतात मांसाहाराला ऐतिहासिक मान्यता आहे.
या सगळ्यात एक अपवाद आहे तिरुपती बालाजी
तिरुमला परिसरात मंदिर ट्रस्टने संपूर्ण मांसाहारावर बंदी घातलेली आहे. मात्र तिरुपती शहरात, ते खाल्लं जातं आणि तिथे नॉनवेज हॉटेल्स मिळतात.
मराठी बातम्या/Viral/
दक्षिण भारतातील मंदिरांजवळ मांसाहारी हॉटेल्स का असतात? भारतातील इतर भागांप्रमाणे तिथे विरोध केला जात नाही का?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement