महिन्याला कमवायचा 18 हजार, पण त्या रात्री मित्राचा आला फोन आणि... 1,2 किंवा 3 नाही खात्यात आले इतके कोटी

Last Updated:

घरी असताना कधी मित्रांचा फोन आला तर आई-वडिल त्यांचा राग करतात. किंवा 'हा चालला आता मित्रांना भेटायला, घरच्यांचं काही नाही...' असा डायलॉग हमखास मारतात. पण आज एका अशाच मित्राच्या फोनमुळे एका व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदललं.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा मित्रांशी संबंधी मीम्स किंवा व्हिडीओ पाहिले असणार, अनेकांनी तर आपल्या मित्रांना श्रीमंत होण्याचे मीम्स देखील पाठवले असणार. यात काही रिल्स असे देखील असतात की ज्यात लोक मजेनं म्हणतात, 'इथे मी असू शकलो असतो, पण माझे मित्र तितके श्रीमंत नाहीत.' जो तो आपल्या मित्रांना वाईटच बोलतो.
एवढंच नाही तर घरी असताना कधी मित्रांचा फोन आला तर आई-वडिल त्यांचा राग करतात. किंवा 'हा चालला आता मित्रांना भेटायला, घरच्यांचं काही नाही...' असा डायलॉग हमखास मारतात. पण आज एका अशाच मित्राच्या फोनमुळे एका व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदललं.
फक्त 18 हजार कमावणारी साधी व्यक्ती करोडपती झाली. आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की, त्या फोननंतर असं काय घडलं? आमचे मित्र तर आम्हाला दररोज रात्री फोन करतात पण आम्ही श्रीमंत होत नाही. असं त्या मित्रानं केलं तरी काय हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल.
advertisement
खरंतर ही कमाल आहे ‘ड्रीम 11’ची या अशा डिजिटल स्पर्धांमध्ये अनेक लोक आपलं लक आजमावतात, पण फार क्वचित कोणाच्या हाती यश लागतं आणि हेच यश मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यातल्या हरसूद गावात राहणाऱ्या अफजल खानला मिळालं. त्याला या संबंधीत बातमी त्याच्या मित्रानं दिली.
अफजल खान यांचं आयुष्य एका रात्रीत पालटून गेलं. फक्त 18 हजार रुपये पगार मिळवणारा अफजल आता थेट 4 कोटी 471 रुपये जिंकून करोडपती झाला.
advertisement
अफजल ट्रान्सपोर्ट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करायचा. त्यांचा मित्र नेहमी त्यांला ड्रीम 11 बद्दल सांगायचा, पण त्यांने सुरुवातीला याकडे फारसं लक्ष दिलं नाही. काही दिवसांनी त्याने टीम बनवायला सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्यात त्यांने एक टीम लावली आणि रात्री 11.30 वाजता त्यांच्या मित्राचा फोन आला. "भाई, तू करोडपती झालास."
advertisement
अफजल तेव्हा झोपला होता. फोनवर बातमी ऐकून त्याची झोप उडाली आणि जेव्हा त्यांने ड्रीम 11 अ‍ॅप उघडून पाहिलं, तेव्हा खात्यात 4 कोटी 471 रुपये जमा झालेले दिसले.
ही आनंदाची बातमी त्यांनी सगळ्यात आधी आपल्या भाऊ आणि वडिलांना सांगितली. गावात बातमी पसरताच अफजल यांच्या घरी बघ्यांची रांग लागली. सगळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले.
advertisement
अफजल म्हणाला की, तो या पैशाचा योग्य वापर करेल. सर्वात आधी वडिलांचे जुने कर्ज फेडणार, नंतर मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार. शिवाय, त्याचं हज यात्रेला जाण्याचंही स्वप्न होतं, ते देखील तो पूर्ण करणार. गावातल्या काही मंदिरांनाही ते देणगी देणार आहेत.
अफजलचे सहकारी राम चौहान सांगतात, "हे आमचे मोठे भाऊसाहेब आहेत. यांनी आम्हाला अकाउंटिंग शिकवलं. आज ते करोडपती झालेत, त्यामुळे आम्हालाही असं वाटतंय की आपणही करोडपती झालोय."
मराठी बातम्या/Viral/
महिन्याला कमवायचा 18 हजार, पण त्या रात्री मित्राचा आला फोन आणि... 1,2 किंवा 3 नाही खात्यात आले इतके कोटी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement