5 वर्षांपासून घरात राहात होता व्यक्ती; अचानक दिसली एक सिक्रेट रूम, दरवाजा उघडताच चक्रावून गेला

Last Updated:

त्या व्यक्तीला आढळलं की त्याच्या जेवणाच्या खोलीच्या तपकिरी दगडाच्या भिंतीतून दोन विटा काढल्या जाऊ शकतात. यानंतर त्याला कुलूप दिसलं, जे उघडल्यावर दरवाजा उघडला

घरात दिसली सिक्रेट रूम
घरात दिसली सिक्रेट रूम
नवी दिल्ली : एका घरमालकाला त्याच्या घरात पाच वर्षे राहिल्यानंतर भिंतीच्या मागे लपलेली एक गुप्त खोली सापडली. पण त्याहीपेक्षा जास्त विचित्र त्याला त्या खोलीत दिसलेलं दृश्य होतं. आत पाहिल्यावर तो चक्रावून गेला. जेव्हा या व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा लोकांनी याचं वर्णन एखादं वाईट स्वप्न म्हणून करण्यास सुरुवात केली.
ऑनलाइन शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीला आढळलं की त्याच्या जेवणाच्या खोलीच्या तपकिरी दगडाच्या भिंतीतून दोन विटा काढल्या जाऊ शकतात. यानंतर त्याला कुलूप दिसलं, जे उघडल्यावर दरवाजा उघडला जो उर्वरित भिंतीमध्ये पूर्णपणे लपलेला होता. दार उघडल्यावर त्याला वॉर्डरोबच्या आकाराची खोली दिसली.
Reddit वर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, "या घरात 5 वर्षे राहिलो, जेवणाच्या खोलीच्या मागे एका छोट्या स्टोरेज रूमकडे जाणारा एक गुप्त दरवाजा आहे हे कधीही लक्षात आलं नाही." असं कॅप्शन याला देण्यात आलं. बऱ्याच लोकांना हे पाहून धक्का बसला आणि त्यांनी त्याची तुलना भयानक स्वप्नाशी केली. एकाने कमेंट केली, "कल्पना करा की ते उघडून पाहिलं आणि समजलं की कोणीतरी बऱ्याच काळापासून आतमध्ये राहात आहे."
advertisement
आणखी एकाने लिहिलं “स्वीट मर्डर रूम भाऊ! काय शोध आहे.” आणि दुसरा म्हणाला, "हे खरंच खूप भितीदायक आहे." यावर घरमालकाने प्रतिसाद दिला की, "थोडं भीतीदायक होतं, पण किमान आत मृतदेह नाहीत." या खोलीत विशेष काही आढळलं नाही, परंतु व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने ते दिसत होतं ते लोकांना घाबरवण्यासाठी पुरेसं होतं.
advertisement
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा गुप्तचर कक्ष का बांधला गेला, हे अजूनही त्याला समजलं नाही. अर्थात, टॉर्चशिवाय त्यात जाणं नक्कीच भीतीदायक होतं. मात्र एवढ्या छुप्या पद्धतीने बनवलेल्या खोलीत काहीच न दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.
मराठी बातम्या/Viral/
5 वर्षांपासून घरात राहात होता व्यक्ती; अचानक दिसली एक सिक्रेट रूम, दरवाजा उघडताच चक्रावून गेला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement