Knowledge: तुम्ही वापरत असलेलं इंटरनेट समुद्राच्या तळातून चालतं, डेटा केबल्स समुद्राखाली कशा टाकल्या जातात?

Last Updated:
तुम्ही वापरत असलेलं इंटरनेट हे समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल्समुळे चालतं, हे तुम्हाला माहिती आहे का? समुद्राच्या तळाशी जाड डेटा केबल्स आहेत. शार्क देखील या केबल्सना कोणत्याही प्रकारचं नुकसान करू शकत नाहीत. या केबल्स जगभरात समुद्राखाली टाकल्या जातात. चला तर, आज अशाच डेटा केबल्सबाबत जाणून घेऊ.
1/10
समुद्रात डेटा केबल्सचं नेटवर्क- जगभर इंटरनेट कसे काम करते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरतर समुद्राखाली असणाऱ्या डेटा केबल्सच्या मदतीनं तुमचं इंटरनेट चालत असते, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. हे डेटा केबल्सचं नेटवर्क संपूर्ण जगभरात समुद्रात खूपच खोलवर आहे.

advertisement
2/10
जगातील सर्वात मोठं डेटा ट्रान्सफर समुद्रातील केबल्सच्या मदतीनं होतं. याला सबमरिन कम्युनिकेशन असंही म्हणतात. इंटरनेट देखील अशाच केबल्सच्या मदतीनं चालते. या केबल टाकण्यासाठी खास केबल लेयर बोटींचा वापर केला जातो. या बोटी अडथळे चुकवत समुद्रतळाच्या सपाट पृष्ठभागावर फिरतात. केबल टाकण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर उच्च दाबाच्या जल जेटच्या मदतीनं या केबल्स उथळ खोलीवर समुद्राच्या खाली गाडल्या जातात.

3/10
गुगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही या केबल्सच्या मदतीनं डेटा ट्रान्सफर करतात. सॅटेलाइटपेक्षा समुद्री केबल्सद्वारे डेटा ट्रान्सफर करणे हा खूपच चांगला पर्याय आहे.

4/10
समुद्रात टाकण्यात येणाऱ्या केबल्स अतिशय किफायतशीर आणि नेटवर्कमध्ये जलद असतात. त्या तुलनेत सॅटेलाइटद्वारे कम्युनिकेशन करणे अवघड आहे. पण समुद्रात डेटा केबल्स बसवण्याचं काम खूपच कठीण आहे. याशिवाय खराब झालेल्या केबल्सची दुरुस्ती करणे देखील अवघड आहे. अशावेळी केबल पकडण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी उथळ पाण्यात रोबोने सज्ज असणारी विशेष दुरुस्ती जहाजे पाठविली जातात.

5/10
एका दिवसात समुद्राच्या तळाशी केवळ 100 ते 200 किमी केबल टाकता येते. 2024 च्या सुरूवातीस, जगभरामध्ये सुमारे 1.4 दशलक्ष किलोमीटर सबमरिन केबल्स वापरात असतील. नवीन केबल्स वापरात आल्यानंतर जुन्या केबल्सद्वारे मिळणारी सेवा बंद केली जाते. त्यामुळे वापरात असणाऱ्या केबल्सची अचूक संख्या सतत बदलत असते.

6/10
डेटा केबल्स या समुद्राखाली एव्हरेस्टच्या उंचीइतक्या खोल आहेत, असं म्हटलं जाते. डेटा केबल्स हाय प्रेशर जल जेटचा वापर करून समुद्राच्या पृष्ठभागाखाली दाबल्या जातात. जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही.

7/10
सर्व खबरदारी घेतल्यानंतरही या केबल्सना शार्कनं लक्ष्य केलं होतं. यावर उपाय म्हणून केबल्सवर शार्क प्रूफ वायर रॅपरचा वापर केला जाऊ लागला. एक केबल सुमारे 25 वर्ष टिकते. जर ती खराब झाली, तर रोबोद्वारे ती दुरुस्त केली जाते.

8/10
सिंगापूर हे जगातील एक असं ठिकाण आहे, जिथे समुद्राच्या खालून सुमारे 16 प्रकारच्या केबल वेगवेगळ्या उद्देशानं जातात. याला सबमरिन केबल्सचं जंक्शन देखील म्हणतात.

9/10
जगामध्ये 164 वर्षांपूर्वी समुद्राखाली पहिली केबल टाकण्यात आली होती. ही केबल टेलिग्राफसाठी टाकण्यात आली होती.

10/10
2013 मध्ये युरोप आणि अमेरिका येथून इजिप्त येथे जाणाऱ्या चार केबल्स काही अज्ञात व्यक्तींनी तोडल्या होत्या. त्यामुळे इजिप्त येथील इंटरनेट स्पीड तब्बल 60 टक्क्यांनी कमी झाला होता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement