बिअरच्या मोहामुळे साप संकटात, टिनमध्ये डोकं अडकलं आणि... रेस्क्यु ऑपरेशनचा Video समोर

Last Updated:

आकर्षक दिसणाऱ्या रिकाम्या टिन मध्ये तोंड घालून अंदाज घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या सापाची चांगलीच फजीती झाली.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 29 नोव्हेंबर : दारुचा मोह अनेक माणसाला असतो. ज्यामुळे माणूस कधीकधी अडचणीत सापडतो. शिवाय हे शरीरासाठी देखील हानिकारक आहे. पण जेव्हा एका मुक्या प्राण्यानेही दारुचा मोह केला, तेव्हा तो देखील संकटात सापडला आहे. मोह हा नेहमीच अडचणीचा ठरत असतो याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे, ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
आकर्षक दिसणाऱ्या रिकाम्या टिन मध्ये तोंड घालून अंदाज घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या सापाची चांगलीच फजीती झाली. या टिनमध्ये सापाचं तोंड अडकलं. सापाने यामधून निघण्याचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ ठरले आहे. ज्यानंतर स्थानिकांना सर्पमित्रांना बोलावून मदत घेतली. त्यानंतर प्राथमिक उपचार करून या युवकांनी त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले.
फोंडाघाट येथील आजूबाजूला जंगलमय भाग असलेल्या एका घराच्या कुंपणात कुत्रे जास्त भुंकू लागल्याने घर मालकाने कानोसा घेतला. तेव्हा त्याने समोर जे पाहिलं ते बघून त्याला आश्चर्य वाटलं एक साप बिअरच्या टिन मध्ये तोंड अडकलेल्या अवस्थेत अंदाजाने फिरताना दिसला. बराचा वेळ तो साप त्या अवघडलेल्या अवस्थेत दिसल्या नंतर घर मालकाने हेल्प अकॅडमी फोंडाघाट या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला कळवल.
advertisement
या संस्थेच्या युवकांनी अनेक प्रयत्न करत काही तासांच्या मेहनतीनंतर सापाचं रेस्क्यु केलं. त्यावर हळद टाकून प्राथमिक उपचार करुन त्या सापाला सुरक्षीत ठिकाणी सोडून देण्यात आलं.
मराठी बातम्या/Viral/
बिअरच्या मोहामुळे साप संकटात, टिनमध्ये डोकं अडकलं आणि... रेस्क्यु ऑपरेशनचा Video समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement