साप सतत का काढतो आपली जीभ बाहेर? 99 टक्के लोकांना माहित नाही कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
साप हा मांसाहारी जीव आहे. तो उंदीर, पाल, अन्य कीटक खातो. तसेच दूध हे सापाचे अन्न नाही. याशिवाय सापाला कान नसतात आणि त्याला लांबचे ही दिसत नाही.
मुंबई : साप हा खूप धोकादायक प्राणी आहे. ज्यामुळे लोक त्याच्यापासून लांबच रहातात. कारण त्याने एकदा का दंश केला की त्याचं विष माणसाचा जीव घेऊ शकतो. एवढंच काय तर यामुळे माणसाला पॅरालिसीसचा देखील धोका आहे. हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण सापाबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही.
चला सापाच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊ
साप हा मांसाहारी जीव आहे. तो उंदीर, पाल, अन्य कीटक खातो. तसेच दूध हे सापाचे अन्न नाही. याशिवाय सापाला कान नसतात आणि त्याला लांबचे ही दिसत नाही. सापाची स्मरण शक्ती अल्प असते.
शिवाय तुम्ही अनेकदा सापाला जीभ बाहेर काढताना पाहिलं असेल पण तो असं का करतो हे माहित नसेल.
advertisement
खरंतर साप जीभेने वास घेतो. त्यामुळे तो जीभ बाहेर काढून आसपासच्या प्राण्यांचा अंदाज घेत असतो. यामुळे त्याला आजूबाजूला हालचाल होत असल्यास जाणवते. कंपनातूनही तो सभोवताली कोणी असल्याचे जाणून घेतो.
आता सापाबद्दलच्या काही अंधश्रद्धा देखील जाणून घेऊ.
-सापाच्या डोक्यावर मणी असतो, सापाला केस असतात, साप धनाचे रक्षण करतो, साप पाठलाग करतो, साप बदला घेतो, साप दूध पितो, साप पुंगीवर नाचतो
advertisement
वरील सगळ्या गोष्टी सापाच्या बाबतीत खोट्या आहेत.
खरं म्हणजे सापाला पुंगीचा आवाजच ऐकू येत नाही. गारुडी जेंव्हा पुंगी वाजवतो तेव्हा त्यावर झडप घेउन चावा घेण्यासाठी साप हलत असतो. लोक त्याला सापाचे नाचणे किंवा डोलने समजतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 19, 2024 12:00 AM IST