Hindu Traditions : गाडीवर देवाचं नाव लिहिणं ठरू शकतं अशुभ, ज्योतिशांनी सांगितलं यामागचं कारण

Last Updated:

अशा वेळी आपण त्या वस्तूचं रक्षण व्हावं आणि ती आपल्यासाठी शुभ ठरावी म्हणून काही धार्मिक किंवा पारंपरिक गोष्टी करतो.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : जेव्हा आपण नवीन किंवा महाग वस्तू खरेदी करतो मग ती कार असो, बाईक असो, फ्रिज, एसी किंवा इतर कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण तेव्हा घरात आनंदाचा माहोल असतो. अशा वेळी आपण त्या वस्तूचं रक्षण व्हावं आणि ती आपल्यासाठी शुभ ठरावी म्हणून काही धार्मिक किंवा पारंपरिक गोष्टी करतो. भारतात किंवा हिंदू धर्मामध्ये या गोष्टी कॉमन आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशा असंख्य गाड्या पाहिल्या असणार ज्यावर देवांचे फोटो आहेत.
पण, प्रश्न असा आहे की हे सगळं करणं योग्य आहे का? यासाठी काही धार्मिक नियम किंवा बंदी आहेत का? किंवा हे असं करणं खरंच फायदेशीर आहे का की याचा उलट परिणाम देखील होऊ शकतो? विषेश म्हणजे गाडीवर थेट भगवानाचं नाव लिहिणं योग्य आहे का?
या विषयावर भोपालचे ज्योतिष आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती पाहूया.
advertisement
गाडीवर स्वस्तिक आणि शुभ-लाभ लिहिण्याचं महत्व
नवीन गाडी किंवा वस्तूवर स्वस्तिकाचं चिन्ह काढणं आणि “शुभ-लाभ” लिहिणं शुभ मानलं जातं. हे फक्त परंपरेचा भाग नाही, तर सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे प्राचीन काळापासून मंगल आणि सौभाग्याचं चिन्ह मानलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण गाडीवर हे चिन्ह लावतो, तेव्हा आपल्या मनातही सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढतो.
advertisement
गाडी किंवा घरात भगवानाची प्रतिमा ठेवणं हा एक चांगला विचार आहे. हे केवळ आपल्याला सुरक्षिततेची जाणीव देत नाही, तर प्रवासादरम्यान भगवानाचं आशीर्वाद आपल्या सोबत असल्याची भावना देते. अनेकजण गाडी सुरू करण्यापूर्वी हात जोडून प्रार्थना करतात किंवा स्टीयरिंगला स्पर्श करून नमस्कार करतात. हे श्रद्धा आणि आस्थेशी जोडलेलं आहे आणि यात काही चुकीचं नाही.
advertisement
गाडीवर देवाचं नाव का लिहू नये?
प्रतिमा लावणं ठीक असलं तरी भगवानाचं नाव (जसं की राम, कृष्ण, शिव, राधा) थेट गाडीवर लिहिणं योग्य नाही. कारण गाडी चालताना धूळ, चिखल, पाणी यामुळे ते नाव खराब होतं. शिवाय गाडीवर लिहिलेल्या नावावर लोकांच्या पायांचा स्पर्श होऊ शकतो, ज्यामुळे भगवानाच्या नावाचा अनादर होतो. त्यामुळे संत-महात्म्यांनीही गाडीवर भगवानाचं नाव लिहू नये असं सांगितलं आहे.
advertisement
काय करावं आणि काय टाळावं?
नवीन गाडी किंवा वस्तूची पूजा जरूर करावी, ही शुभ मानली जाते.
स्वस्तिकाचं चिन्ह आणि “शुभ-लाभ” लिहिणं योग्य आणि परंपरेला साजेसं आहे.
भगवानाची प्रतिमा किंवा लहान मूर्ती ठेवणं उत्तम, पण नाव लिहिणं टाळावं.
गाडी स्वच्छ ठेवावी, कारण ते फक्त सुरक्षिततेसाठीच नाही तर भगवानाच्या प्रतिमेचा सन्मान राखण्यासाठीही महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/Viral/
Hindu Traditions : गाडीवर देवाचं नाव लिहिणं ठरू शकतं अशुभ, ज्योतिशांनी सांगितलं यामागचं कारण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement