कृषी हवामान : आठवड्याच्या सुरवातीलाच पाऊस हाहाकार माजवणार, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

Last Updated:

Monsoon 2025 : भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 जून 2025 रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. मान्सून मे अखेरीस महाराष्ट्रात सक्रिय झाला असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तो स्थिर असल्याचे निरीक्षण आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) 23 जून 2025 रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. मान्सून मे अखेरीस महाराष्ट्रात सक्रिय झाला असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तो स्थिर असल्याचे निरीक्षण आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी यलो आणि रेड अलर्ट जारी केला असून, नागरिक आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोकण विभाग
मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत काही भागांत पाणी साचण्याची शक्यता, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे मुसळधार पावसाचा इशारा आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने शेतकऱ्यांना पेरणीबाबत घाई न करण्याचा सल्ला दिला आहे, कारण अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
advertisement
सांगली व कोल्हापूर परिसरात पूरस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह काही भागांत जोरदार सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाडा
उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड येथे पावसाचे प्रमाण कमी राहील.
दक्षिण मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव भागातही हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.पावसाचा प्रभाव संपूर्ण मराठवाड्यात मर्यादित आणि खंडित स्वरूपाचा राहील.
advertisement
विदर्भ
नागपूर,चंद्रपूर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावती आणि अकोला येथे काही अंशी पाऊस अपेक्षित आहे, परंतु तुलनेत नागपूर आणि चंद्रपूरमध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडू शकतो.या भागासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला
पावसाचा जोर पाहता पेरणीची घाई टाळावी. काही भागांत अतिवृष्टीमुळे पाणथळ जमीन आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान स्थिर होईपर्यंत पेरणी थांबवावी, असे हवामान विभागाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : आठवड्याच्या सुरवातीलाच पाऊस हाहाकार माजवणार, या जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement